India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अमित शाहांनी सपत्निक घेतले कोल्हापूरच्या श्रीअंबाबाईचे दर्शन

India Darpan by India Darpan
February 19, 2023
in राज्य
0

 

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय गृह मंत्री श्री. शाह यांनी पत्नी सौ. सोनल अमित शाह यांच्यासह कुंकूमार्चन पूजा केली. तसेच ‘आई अंबाबाई, सर्वांना सुख, समृध्दी दे!’ अशी प्रार्थना केली.

यावेळी मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गोपीचंद पडळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, समरजितसिंह घाटगे, महेश जाधव, राहुल चिकोडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते. गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा श्री अंबाबाईची प्रतिमा देवून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज व लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Home Minister Amit Shah Ambabai Darshan Kolhapur


Previous Post

निवडणूक आयोगाचा निकाल, धनुष्यबाण चिन्ह, शिवसेना नाव यावर शरद पवारांनी केले हे मोठे भाष्य…

Next Post

कोल्हापूरच्या न्यू एज्युकेशन सोसायटी शतक महोत्सवी सांगता समारंभ : अमित शहांसह मान्यवरांनी केल्या या घोषणा

Next Post

कोल्हापूरच्या न्यू एज्युकेशन सोसायटी शतक महोत्सवी सांगता समारंभ : अमित शहांसह मान्यवरांनी केल्या या घोषणा

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group