बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देशात हॉलमार्किंग योजनेला मिळाले मोठे यश, इतक्या सराफांनी केली नोंदणी

by Gautam Sancheti
ऑगस्ट 21, 2021 | 7:39 pm
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

नवी दिल्ली – हॉलमार्किंग योजनेला मोठे यश मिळत असून 1 कोटीहून अधिक दागिन्यांचे अत्यंत शीघ्र गतीने हॉलमार्क चिन्हांकन पूर्ण झाले आहे. बीआयएस अर्थात भारतीय मानके विभागाच्या महासंचालकांनी एका पत्रकार परिषदेत भारतातील हॉलमार्किंगमध्ये होत असलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली. 90,000 हून अधिक सराफांनी याच कालावधीत नोंदणी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि सहकार्यामुळे या योजनेला मोठे यश मिळाल्याचे महासंचालकांनी सांगितले. नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या वाढून 91,603 झाली आणि 1 जुलै, 2021 पासून 20 ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत हॉलमार्किंगसाठी प्राप्त झालेल्या दागिन्यांची संख्या आणि हॉलमार्क चिन्हांकन पूर्ण झालेल्या दागिन्यांची संख्या अनुक्रमे एक कोटी सतरा लाख आणि एक कोटी दोन लाख झाली. 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान हॉलमार्किंगसाठी दागिने पाठवणाऱ्या सराफांची संख्या 5,145 वरून वाढून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 दरम्यान 14,349 झाली; आणि 861 AHC अर्थात मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्रांनी HUID- म्हणजे हॉलमार्क विशिष्ठ ओळख क्रमांक आधारित प्रणालीनुसार हॉलमार्किंग सुरू केले.

हॉलमार्किंगच्या गतीच्या मुद्द्यावर बोलताना महासंचालकांनी सांगितले की हॉलमार्किंगच्या गतीमध्ये हळूहळू आणि समाधानकारक वाढ झाली आहे. 20 ऑगस्ट 2021 रोजी एकाच दिवसात 3 लाख 90 हजार दागिन्यांचे हॉलमार्क चिन्हांकन केले गेले. देशभरात हॉलमार्किंग अनिवार्य झाल्यास सध्याच्या गतीने एका वर्षात 10 कोटी दागिन्यांच्या हॉलमार्किंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही , असेही ते म्हणाले. 256 जिल्ह्यांमध्ये एएचसीची विद्यमान क्षमता मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही, यासारख्या काहीनी केलेल्या दाव्याचे महासंचालकांनी खंडन केले. त्यांनी यासंदर्भात आकडेवारी सादर केली. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 या पंधरवड्यात दागिने प्राप्त झालेल्या 853 एएचसीपैकी फक्त 161 एएचसीना दररोज 500 पेक्षा जास्त दागिन्यांचे नग मिळाले आणि 300 पेक्षा जास्त एएचसीना दररोज 100 पेक्षा कमी नग मिळाले, असे त्यांनी सांगितले.

सरकार आभूषण उद्योगाच्या मागण्यांबाबत संवेदनशील होते आणि त्यांच्या वास्तविक मागण्या ग्राह्य धरण्यात आल्या. अनिवार्य हॉलमार्किंग सुरू केल्यानंतर, अनिवार्य हॉलमार्किंगच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी शिफारस केलेल्या उपायांसाठी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने सहा बैठका घेतल्या आणि काही दिवसांपूर्वी त्याचा अहवाल सरकारला सादर केला, असे महासंचालकांनी सांगितले. आभूषण उद्योगातील काहींनी संपाची हाक दिली होती,ती अनुचित आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 19 ऑगस्ट 2021 रोजी याविषयी संबंधितांच्या बैठकीत, अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी काहींनी मांडलेल्या संपाच्या प्रस्तावाचा निषेध केला आणि एचयूआयडी – आधारित हॉलमार्किंग योजनेला पूर्ण पाठिंबा दिला, असे महासंचालकांनी सांगितले.

केंद्र सरकारने सराफा उद्योगाच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी उचललेल्या पावलांची सविस्तर माहिती देतांना भारतीय मानक ब्यूरोच्या महासंचालकांनी पुढील तथ्ये मांडली: ज्या जिल्ह्यात एएचसी अर्थात मूल्यांकन आणि हॉलमार्किंग केंद्र आहे, अशा केवळ 256 जिल्ह्यांतच हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आहे आहे. एचयूआयडी अर्थात हॉलमार्क विशिष्ठ ओळख क्रमांक सुरुवातीला एएचसी पातळीवरच अंमलबजावणी करण्यापुरते मर्यादित असून, एकदा नवी व्यवस्था लागू झाल्यावर सराफा व्यापारी आणि ग्राहकांपुरतीच त्याची अंमलबजावणी असणार आहे. नोंदणी प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात आली असून, नोंदणीशुल्कही माफ करण्यात आले आहे. 20, 23 आणि 24 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याची परवानगी आहे. त्याच शुद्धतेच्या विविध धातूंचे मिश्रण करुन तयार दागिन्यांना मंजूरी देण्यासाठी भारतीय मानक ब्यूरोच्या नियमात दुरुस्ती करण्यात आली आहे. एएचसी पातळीवर देखील दागिन्यांची हाताळणी करणे शक्य व्हावे यासाठी सॉफ्टवेअर मध्ये सुधारणा. मुख्यालयात आणि विविध शाखां कार्यालयांमध्ये मदतकेंद्र स्थापन करण्यात आली असून, या संदर्भात आजवर 300 जनजागृती शिबिरे घेण्यात आली आहेत.
हॉलमार्क शी संबंधित चिंता आणि मुद्यांवर सल्लागार समितीने सखोल आढावा घेतला होता आणि आपला अहवाल ग्राहक व्यवहार विभागा- DoCA कडे सूपूर्द केला होता.

या संदर्भातल्या शंका आणि प्रश्नांना उत्तर देतांना, भारतीय मानक ब्यूरोच्या महसंचालकांनी सांगितले की, सराफा आणि सराफा व्यावसायिकांच्या, व्यवसाय-ते-व्यवसाय दागिने देवाणघेवाण याचा बीआयएस , माग घेणार आहेत, असा संपूर्ण दिशाभूल करणारा प्रचार करण्यात आला होता, तसेच, सर्व सराफा व्यावासायिकांना आपल्या विक्रीची सर्व माहिती बीआयएस च्या पोर्टलवर आपलोड करावी लागणार आहे, असाही गैरसमज आहे. मात्र, अशी काहीही गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एचयूआयडी- आधारित हॉलमार्क व्यवस्था सर्वांसाठी फायदेशीर आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. ही व्यवस्था सराफा उद्योगात पारदर्शकता आणेल. तसेक ग्राहकांना त्यांच्या पैशांच्या मोबदल्यात योग्य, खरा माल मिळण्याची हमी यामुळे मिळेल आणि ‘इन्स्पेक्टर राज’ व्यवस्थेचेही उच्चाटन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी – ई – पिक पाहणी प्रकल्पात शेतकर्‍यांचा सहभाग महत्त्वाचा; राज्य महसूल अप्पर सचिव नितीन करीर

Next Post

कोरोना बाधित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे मनपा रुग्णालयात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Dr amol kolhe

कोरोना बाधित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे मनपा रुग्णालयात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011