पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप असून वापरकर्त्यांना अधिक सहजसोप्या पद्धतीने हे एप वापरता यावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतींवर काम करत आहे. व्हॉट्सअॅपवरील गोपनीयतेची समस्या लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने एक खास फीचर लागू केले आहे. याद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपवर तुमचे नाव लपवू शकाल. त्यासाठी एक सोपी युक्ती आपल्याला वापरावी लागणार आहे.
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना सेटिंगमध्ये आपलं नाव टाकावं लागतं. नावाची जागा आपल्याला रिक्त ठेवता येत नाही. परंतु एका सोप्या युक्तीने गोपनीयता राखताना तुम्ही तुमचे नाव लपवू शकता किंवा ते रिक्त ठेवू शकता. याद्वारे तुमची ओळखही सुरक्षित करू शकता. व्हॉट्सअॅपमध्ये तुमचे नाव अदृश्य ठेवण्यासाठी आपल्याला काही पद्धती फॉलो कराव्या लागतील. यामध्ये पहिली पद्धत म्हणजे व्हॉट्सअॅपमध्ये तुमचं नाव लपवण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरवर व्हॉट्सअॅप ओपन करा. आता -> , ही दोन चिन्हे कॉपी करा. यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपमधील सेटिंग्ज ऑप्शनवर जावे लागेल. तिथे तुमच्या सध्या टाकलेल्या नावावर टॅप करा आणि नंतर पेन्सिल चिन्हावर क्लिक करा. मग ही चिन्हे तुमच्या नावाच्या जागी कॉपी करा. त्यानंतर तुम्हाला बाणाचे चिन्ह काढून टाकावे लागेल आणि तुमचे नाव बदलण्यासाठी ओके वर टॅप करावे लागेल. यानंतर तुमचे नाव तुमच्या व्हॉट्सअॅपवर ब्लँक होईल.
नाव लपवण्याचा फायदा काय?
व्हॉट्सअॅपवर अनोळखी लोकांना आपलं नाव समजू नये, यासाठी याचा फायदा होईल. तसेच जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले, तर जोपर्यंत ते तुम्हाला कॉन्टॅक्टमध्ये अॅड करत नाहीत तोपर्यंत त्यांना तुमचे नाव दिसणार नाही. यामुळे तुमची गोपनीयता देखील सुरक्षित राहील.