नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेना पक्षातील राजकीय वादळ दिवसेंदिवस आणखी गडद होत आहे. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातील कलगीतुरा आणखीनच रंगत आहे. आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाजी पार्कवर होणारा हा मेळावा शिवसेनेची मोठी परंपरा आहे. त्याला मोठा इतिहास आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव यांनी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. अद्याप महापालिकेने त्याला परवानगी दिलेली नाही. त्यातच एकनाथ शिंदे गटानेही दसरा मेळाव्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दसरा मेळावा कोण घेणार, कुणाला परवानगी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला आहे. ते नागपूर दौऱ्यावर आहेत. उद्धव यांच्या अर्जाला परवानगी मिळणार का, असे विचारले असता फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने उत्तर दिले आहे. बघा, ते काय म्हणाले याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1563403009387741184?s=20&t=tvDgmPK9V-Z9O818Eq_z_A
HM Devendra Fadanvis on Thackeray Dasara Melava Permission