मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पशुसंवर्धन विभागाने घेतला हा ऐतिहासिक निर्णय; ग्रामीण पशुपालनाला मिळणार मोठी चालना

by India Darpan
जून 9, 2021 | 10:46 am
in राज्य
0
sunil kedar 1140x570 1

कृत्रिम रेतनाद्वारे लिंग निदान केलेल्या वीर्यमात्रा वापरून पशुपालकांसाठी उच्च वंशावळीच्या कालवडी निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा क्रांतिकारी निर्णय
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रा (Sex Sorted Semen) वापर करून उच्च अनुवंशिकतेच्या कालवडी तथा पारड्यांची निर्मिती करण्यात येणार असून यामध्ये राज्यात आता ९० टक्के उच्च वंशावळीच्या मादी वासरांची निर्मिती होणार आहे. ही वीर्यमात्रा फक्त ८१ रुपयांना उपलब्ध करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
लिंग विनिश्चित वीर्यमात्रांचे उत्पादन व पुरवठा कार्यक्रमाचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांच्या  हस्ते मंत्रालयात उद्घाटन झाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची उपस्थिती होती. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह,अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे हे ऑनलाईन उपस्थित होते. तर सहसचिव माणिक गुट्टे,अवर सचिव शैलेश केंडे यांचीही उपस्थिती होती.
माध्यम प्रतिनिधींशी ऑनलाईन बोलताना श्री.केदार  म्हणाले , या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकरी यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे. त्यांचे जीवनमान उंचावणारा हा पशुसंवर्धन विभागाचा निर्णय आहे. फिरत्या पशुचिकित्सालयांद्वारे व पशुसंवर्धन विभागाच्या प्रत्येक अधिकारी- कर्मचारी यांच्यामार्फत या उपक्रमाची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा अशा सूचनाही त्यांनी यावेळी त्यांनी दिल्या.
कृत्रिम रेतनासाठी लिंग निदान केलेल्या वीर्यमात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेण्यात आला असून यातून जवळपास ९०% उच्च वंशावळीच्या गाई म्हशींच्या मादी वासरांची निर्मिती करणे शक्य होणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.
सर्वसाधारणपणे 1100 ते 1200 रुपयांपर्यंत मिळणारी वीर्यमात्रा केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसहाय्यामुळे पशुपालकांना  ८१रुपये इतक्या माफक दरामध्ये उपलब्ध होणार असल्याचे सांगून पशुपालकांना नजीकचे पशुवैद्यकीय दवाखाने आणि सहकारी / खाजगी दूध संघ यांच्याकडे ही वीर्यमात्रा उपलब्ध होणार आहे. उच्च वंशावळीचा मादी वासरांची निर्मिती होऊन भविष्यात राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. नर वासरांच्या संगोपनावरील खर्च कमी होऊन वाढीव दूध उत्पादनामुळे पशुपालक आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठा आरक्षणाच्या तिढ्यात नेत्यांच्या ‘उड्या’!

Next Post

नाशिक – गावठी कट्टा व जीवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या एका गुन्हेगारास अटक

India Darpan

Next Post
crime diary 2

नाशिक - गावठी कट्टा व जीवंत काडतुसे जवळ बाळगणार्‍या एका गुन्हेगारास अटक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011