नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील काही वर्षात फास्टैग द्वारे केलेल्या इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. वर्ष 2022 मध्ये राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांसह इतर टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे झालेल्या एकूण टोल संकलनात 2021 च्या 34,778 कोटी रुपये संकलनाच्या तुलनेत अंदाजे 46 टक्क्यांनी वाढ होऊन ते 50,855 कोटी रुपये झाले आहे.
डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे सरासरी दैनिक पथकर संकलन 134.44 कोटी रुपये झाले आणि एका दिवसातील सर्वाधिक संकलन 24 डिसेंबर 2022 रोजी 144.19 कोटी रुपये झाले. याचप्रमाणे वर्ष 2022 मध्ये फास्टैग व्यवहारांमध्ये वर्ष 2021च्या तुलनेत 48%नी वाढ दिसून आली. वर्ष 2021 आणि वर्ष 2022 मध्ये अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी फास्टैग व्यवहार झाले.
आजमितीला एकूण 6.4 कोटी फास्टैग वितरीत करण्यात आले आहेत तर फास्टैग उपलब्ध असलेल्या टोलनाक्यांच्या संख्येतही वाढ झाली असून ती 2022 मध्ये 1,181 (323 राज्य महामार्ग टोलनाके ) इतकी झाली आहे मागील वर्ष 2021 मध्ये ही संख्या 922 होती.
यात उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, फास्टैग कार्यक्रमांतर्गत आगमनानंतरच्या ऑन-बोर्डिंग राज्य टोलनाक्यांसाठी 29 वेगवेगळ्या राज्यांच्या संस्था/अधिकारिणी सह सामंजस्य करार करण्यात आले आहेत ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांचा समावेश आहे.
Highway Fast Tag Toll Collection Transparency