गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अवघ्या ५० दिवसांमध्येच सोडून गेलेल्या पत्नीला मिळणार एवढी खावटी; उच्च न्यायालयाचे आदेश

by India Darpan
नोव्हेंबर 10, 2022 | 5:09 am
in राज्य
0
court

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पती – पत्नी वेगळे झाल्यानंतर पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी पतीकडून खावटी दिली जाते. असेच एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. पण या प्रकरणातील लग्न केवळ ५० दिवसांचेच आहे. लग्न झाल्यानंतर केवळ ५० दिवसांमध्ये पतीला सोडून माहेरी निघून गेलेल्या पत्नीस मासिक सात हजार ५०० रुपये अंतरिम खावटी मंजूर करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

या प्रकरणातील पत्नी नागपूर तर, पती पुणे येथील रहिवासी आहे. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी नागपूर कुटुंब न्यायालयाने पत्नीला मासिक १० हजार रुपये अंतरिम खावटी मंजूर केली होती. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने रेकॉर्डवरील पुरावे व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय लक्षात घेता कुटुंब न्यायालयाच्या वादग्रस्त आदेशात बदल केला व खावटीमध्ये समतोल साधून पत्नीस मासिक ७ हजार ५०० रुपये मंजूर केले.

हुंड्याचे कारण..
पती व सासरची मंडळी लग्न झाल्यापासूनच हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याचे या प्रकरणातील महिलेने सांगितले आहे. त्यामुळे तिला माहेरी जावे लागले. सध्या तिच्याकडे उत्पन्नाचा काहीच स्त्रोत नसल्याने ती पालकांच्या आधारावर जीवन जगत आहे. पती खासगी कंपनीत कार्यरत असून, त्याला वार्षिक १३ लाख ३२ हजार रुपये वेतन मिळते, तरीदेखील हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याचे पत्नीचे म्हणणे आहे.

पतीकडून आरोप अमान्य
पतीने पत्नीचे सर्व आरोप अमान्य केले आहेत. पती पालनपोषण करीत नाही, तसेच इतर सर्व आरोप खोटे असल्याचे पतीने म्हणले आहे. पती सध्या एका खासगी कंपनीत ३० हजार रुपये मासिक वेतनाने काम करीत आहे. पत्नी लघुचित्रपट, शिकवणी वर्ग, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व बँक एजन्ट म्हणून पैसे कमविते, असे न्यायालयाला त्याच्याकडून सांगण्यात आले.

High Court Order Wife Husband Compensation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बँक कर्मचाऱ्यांची संपाची हाक; सलग दोन दिवस बँका राहणार बंद

Next Post

‘शैक्षणिक ट्युशन फी परवडणारीच हवी’, सर्वोच्च न्यायालयाने खडसावले

India Darpan

Next Post
SC2B1

'शैक्षणिक ट्युशन फी परवडणारीच हवी', सर्वोच्च न्यायालयाने खडसावले

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011