रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पतीऐवजी प्रियकरासोबत राहण्यास विवाहितेला परवानगी; हायकोर्टाचा मोठा निर्णय

by India Darpan
जून 21, 2023 | 5:12 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
court


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वत:च्या मर्जीने पतीऐवजी मित्रासोबत राहू इच्छिणाऱ्या एका महिलेला उत्तराखंड उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच या प्रकरणातील पत्नीचा ताबा मागणाऱ्या पतीला न्यायालयाने चपराक लगावली आहे. जस्टिस मनोज कुमार तिवारी आणि जस्टिस पंकज पुरोहित यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

अतिशय महत्त्वाचा निर्वाळा देण्यात आलेल्या या प्रकरणातील जोडप्याचे लग्न २०१२ मध्ये झाले. त्यानंतर दोन मुले झालीत. एक दहा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये पत्नी माहेरी गेली. ती परत आलीच नाही. ती तिच्या मित्रासोबत राहत असल्याची शंका आली. मित्राने अवैधरित्या पत्नीला घरी ठेवले असल्याचा दावा पतीने याचिकेत केला. त्यानुसार, पत्नीचा ताबा मिळण्याची विनंती करणारी रिट याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.

कोर्टाने सुनावणीदरम्यान पत्नीला कोर्टात उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानुसार याचिकाकर्त्याची पत्नी कोर्टात उपस्थित होती. तिने न्यायालयाला सांगितले की, तिचा पती आणि या प्रकरणातला प्रमुख याचिकाकर्ता तिच्याशी चांगला वागत नाही, दुर्व्यवहार करतो. त्यामुळेच मला त्याच्या घरात राहण्याची इच्छा नाही. तसेच माझ्या मित्रासह मी माझ्या मर्जीने राहते आहे. मात्र, या महिलेच्या पतीचे आरोप फेटाळले आहेत. कुठल्याही कारणाशिवाय ती तिच्या मित्रासह राहते आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

कोर्टाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणातल्या मुख्य याचिकाकर्त्याला म्हणजेच महिलेच्या पतीला दिलासा दिला नाही. या प्रकरणात कोर्टाने असं म्हटलं आहे की प्रतिवादी क्रमांक ९ म्हणजेच या महिलेचा मित्र याच्यासह ती महिला तिच्या मर्जीने राहते आहे. त्यामुळे तिला तसं राहण्याची संमती दिली जाते आहे हे सांगत महिलेच्या पतीने दाखल केलेली याचिका फेटाळली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

यंदा पहिल्यांदाच आषाढी वारीमध्ये महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र सोयी सुविधा

Next Post

जानेवारी ते मे या काळात इतक्या हजार युवकांना मिळाला रोजगार

Next Post
job

जानेवारी ते मे या काळात इतक्या हजार युवकांना मिळाला रोजगार

ताज्या बातम्या

Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011