शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

‘हॅलो’… ‘वंदे मातरम्’… ‘जय महाराष्ट्र’… राजकारण तापले; अधिवेशनातही गाजणार

by Gautam Sancheti
ऑगस्ट 17, 2022 | 5:15 am
in राज्य
0
mungatiwar

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लँडलाईन फोन असो की, मोबाईल फोन यावरून संवाद साधताना पहिला शब्द कुणीही हॅलो असेच उच्चारते. परंतु काही जण नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम किंवा अन्य आवडीचा शब्द उच्चारून मग संवादाला सुरुवात करतात. परंतु बहुतांश जणांचा हॅलोने संवादाचा प्रारंभ होतो, मात्र आता हॅलो ऐवजी वंदे मातरम अशा शब्दाने सुरुवात करून मगच संवाद साधावा, असा अथवा जणू काही राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी काढल्याने त्यावरून राज्यभरात बरेच वादांग माजले असून विरोधी पक्षांनी याबाबत टीकास्त्र सुरू केले आहे. तसेच उलट सुलट चर्चा देखील सुरू झालेली आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, या सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेवरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सरकारी कार्यालयात फोनवर नमस्कार करण्याऐवजी वंदे मातरम् म्हणण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. तर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अमृत महोत्सवी दिनाचे औचित्य साधत यापुढे महाराष्ट्रातील सर्व सहकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केली होती. शिंदे-फडणवीस सरकारचा खातेवाटपाचा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पार पडला. त्यावेळी मुनगंटीवार यांना सांस्कृतिक खाते देण्यात आले. आजपासून इंग्रजानी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. आपण फोन उचलल्यावर ‘हॅलो’ म्हणतो. हा देश जेव्हा गुलामगिरीत होत. तेव्हा इंग्रजांनी हा शब्द आणला होता. मात्र, आपल्या स्वातंत्र्यविरांनी वंदे मातरम् म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचे स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रुपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

राज्याचे माजी अन्न पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मी फोनवर वंदे मातरम् म्हणणार नाही. मी फोनवर जय महाराष्ट्र म्हणणार, अशा शब्दांत त्यांनी मुनगंटीवारांच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मंत्री झाल्यानंतर त्यांनी हा आदेश काढला, या निर्णयात वाईट असे काहीच नाही. पण काही जण फोनवर ‘जय हिंद’ काही ‘जय महाराष्ट्र’ बोलतात. आमचे पोलिस फोन केल्यानंतर ‘जय हिंद’ असे म्हणतात. शिवसेनेचे लोक ‘जय महाराष्ट्र’ असे म्हणतात. त्यामुळे मीही ‘जय महाराष्ट्र’ म्हणणार, असे भुजबळ म्हणाले.

या प्रकरणी पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हॅलो हा शब्द इंग्रजांनी 18 व्या शतकात आणला होता. त्यांना वंदे मातरम् या विरोध आहे, त्यांना आपण समजवण्याचा प्रयत्न करू. गेल्या अडीच वर्षात निर्णय न घेणार आता विरोध करून तत्वज्ञान शिकवत आहेत, असे म्हणत त्यांना मविआवर हल्लाबोल केला. मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्याबरोबर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. आजपर्यंत इंग्रजांनी दिलेला शब्द उपयोगात आणला आहे. हा देश जेव्हा गुलामगिरीत होता, तेव्हा त्यांनी हा शब्द दिलेला होता. स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम् म्हणत तिरंगा हातात घेऊन, या देशाचे स्वातंत्र्य मंगलकलशाच्या रूपाने दिले. पण अजूनही इंग्रजांची छाप काही कमी होत नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटले होते.

वंदे मातरम् शिवाय दुसरा सर्वांना मान्य असेल, असा पर्याय द्या, अशा शब्दांत रझा अकादमीने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशाला आक्षेप घेतला आहे. रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी यांनी याबाबत मुस्लीम उलेमा आणि इतर संबंधितांशी सल्लामसलत करणार असल्याचे म्हटले आहे. तर ‘वंदे मातरम् नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला तर ते जय महाराष्ट्र बोलतात, मी वंदे मातरम् म्हणणार नाही, मी जय महाराष्ट्र म्हणेन, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

मंत्री झाल्यावर आदेश काढला, या निर्णयात वाईट वाटण्यासारखे काही नाही. काही जण ‘जय हिंद’ बोलतात, काही ‘जय महाराष्ट्र’ बोलतात. आमचे पोलीस बांधव फोन केल्यावर जय हिंद म्हणतात. शिवसेनेचे लोक जय महाराष्ट्र म्हणतात. आता शिंदेंनी मुनगंटीवारांना विचारावे, की फोन केल्यावर काय म्हणायचे?, असे भुजबळ म्हणाले. तर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आम्ही तसे म्हटले नाही, तर तुम्ही जेलमध्ये टाकणार की पोलिसांमार्फत केस करणार, असा सवालही आव्हाड यांनी केला. कोणावरही अशी जबरदस्ती करू नका. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी. श्वास कुठून, कसा घ्यावा, हेही तुम्हीच ठरवणार का, असा सवालही त्यांनी केला. भारतीय संस्कारात नमस्कार केला जातो. त्या नमस्कारानेच संस्कृतीची सुरुवात होते. कोणी ‘जय भीम’ बोलतो तर कोणी ‘जय हिंद’ करतो. त्यातून भावना व्यक्त होतात, त्या महत्त्वाच्या आहेत.

दरम्यान, मुनगंटीवार यांनी या वादाची दखल घेतली आहे. ते म्हणाले की, हॅलो म्हणत असाल तर ‘वंदे मातरम्’चा पर्याय दिलेला आहे. जर तुम्ही याआधी जय हिंद म्हणत असाल, जय श्रीराम म्हणत असाल, तर त्यांच्यासाठी हे नाही. काही जण फक्त फाटे फोडण्याचे काम करतात. हॅलो, या इंग्रजी शब्दाबद्दल मी सांगतोय. एवढं समजत नसेल तर चिंतेची बाब आहे, असे या वादानंतर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Hello Vande Mataram Jai Maharashtra Politics
Sudhir Mungantiwar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणेकरांसाठी खुशखबर! या मार्गावरील मेट्रोची चाचणी यशस्वी

Next Post

‘हर हर शंभू’ गाणे अखेर युट्यूब वरुन हटविले

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
GST 4
महत्त्वाच्या बातम्या

७.५६ कोटी रुपयांची करचोरी…मुंबईत केपी क्रिएशन वर्ल्डचे अंकित गांधी यांना अटक

सप्टेंबर 12, 2025
cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
Next Post
Har Har Shambhu 1

'हर हर शंभू' गाणे अखेर युट्यूब वरुन हटविले

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011