मुकुंद बाविस्कर, मुंबई
विमान किंवा हेलिकॉप्टर याचा उपयोग साधारणतः जलद गतीने प्रवासी वाहून नेण्यासाठी करायला जातो. तसेच लष्करात देखील या हवाई वाहनांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपत्ती काळात मदत आणि बचाव करण्यासाठी हेलिकॉप्टर वापरले जाते. परंतु एखाद्या छोट्याशा प्राण्याला मारण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केलेला आपण कधी ऐकलंय का? नाही ना! परंतु हे सत्य आहे, अमेरिकेचे चक्क उंदराला मागण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. तो कसा काय?
खरे म्हणजे यापूर्वी देखील हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या साह्याने शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्याचे प्रयोग झालेले आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुक्यात सुमारे ४० वर्षांपूर्वी ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असता हेलिकॉप्टरच्या साह्याने औषध फवारणी करण्यात आली होती. असाच प्रयोग अन्य ठिकाणी देखील झाल्याची नोंद आहे. परंतु एखाद्या क्षुल्लक वाटणाऱ्या प्राण्याला हेलिकॉप्टरच्या साह्याने मारण्याचा हा प्रयोग जगातील प्रथमच असावा, असे म्हटले जाते. दरम्यान पर्यावरणवादी आणि पशुपक्षी प्रेमींच्या मात्र या योजनेला विरोध आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या फॅरलॉन बेटांवर उंदरांना मारण्यासाठी हेलिकॉप्टर मधून विषारी औषध टाकण्यात येणार आहे, कारण या बेटावर प्लेगचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरमधून धोकादायक उंदरांवर विष ओतले जाणार आहे. कॅलिफोर्नियाच्या अधिकार्यांनी तसे करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, या योजनेला मान्यता द्यायची की नाही यावर बराच काळ वाद सुरू होता. त्यानंतर स्थानिक आयुक्तांनी वादग्रस्त योजनेच्या बाजूने मत दिले.
विशेष म्हणजे यूएस फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिसने ही योजना प्रस्तावित केली होती. त्याचबरोबर स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतरही आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यातून केवळ उंदीरच मरणार नाहीत, तर इतर प्राण्यांनाही याचा फटका बसेल, असा त्यांचा अंदाज आहे. तर दुसरी कडे फॅरलॉन बेटांवर संशोधन करणाऱ्या वन्यजीव अधिकारी आणि तज्ज्ञांनी असा युक्तिवाद केला की, उंदरांना मारण्यासाठी त्वरित आणि कठोर उपाय आवश्यक आहेत.
कारण प्लेगची साथ ही भयानक असते याचा अनुभव जगभरातील अनेक देशांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात प्लेगच्या साथीने स्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत भयानक अनुभव घेतला असून यात हजारो लोक मृत्युमुखी पडले होते तर सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सुरत शहरात प्लेग साथीने थैमान घातले होते. याच काळात ही साथ मराठवाडयातील बीड जिल्ह्यात देखील आली होती. तेव्हा सुरत आणि बीड शहरात प्रचंड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
अमेरिकेत तर उंदीरांच्या स्थानिक प्रजाती सर्वासाठी धोकादायक आहेत. दुसरीकडे, वन्यजीव एजन्सीने सांगितले की जर FWS च्या प्रादेशिक संचालकांनी देखील योजनेला मान्यता दिली, तर सॅन फ्रान्सिस्को किनारपट्टीच्या अगदी जवळ असलेल्या बेटांवर 2023 पर्यंत हेलिकॉप्टर सोडले जाऊ शकतात. मात्र, या योजनेवर मतदानापूर्वी दीर्घ भावनिक चर्चा झाली.
पर्यावरणवादी, पशु प्रेमी यानी इशारा दिला की, एफडब्ल्यूएसकडे समुद्री पक्षी, राप्टर्स आणि इतर प्राण्यांना कमीतकमी नुकसान करण्याची कोणतीही योजना नाही. या प्रस्तावात असे म्हटले आहे की, कीटकनाशक वापरण्यापूर्वी बेटांवरून काही जीव दूर हकलण्यासाठी कर्मचार्यांनी लेझर, फटाके आणि पुतळ्यांसह इतर तंत्रांचा वापर केला पाहिजे. तर दुसरीकडे या योजनेच्या समर्थकांनी असे म्हटले आहे की, उंदीरांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी ब्रॉडिफेकॉम कीटकनाशकाचा वापर करणे हा एकमेव मार्ग आहे. यापुर्वी १९व्या शतकात बेटावरील खलाशांनी याचा नकळतपणे याचा वापर केला होता. मात्र, या बेटावर ज्या प्रजाती उरल्या आहेत, त्याही सुरक्षित राहण्यासाठी त्यांना वाचवण्याचे काम करावे लागेल, असेही ते म्हणाले.
वेस्टर्न अलायन्स फॉर नेचरच्या सारा वॅन म्हणाल्या की, कॅलिफोर्नियाच्या किनार्यावरून उडणारे भुकेले पक्षी देखील याला बळी पडतील, कारण कीटकनाशके वापरल्यास उंदीर मारले जातील आणि जेव्हा भुकेले पक्षी मेलेले उंदीर खातील तेव्हा त्याचा जीवही जाईल, याबाबत निर्णय काय होईल सांगता येत नाही परंतु या योजनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.