नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसा बरोबरच काही ठिकाणी गारपीट झाली. या गारपिटीमुळे सर्वात मोठा फटाका कांद्याला बसला आहे.
चांदवड तालूक्यातील पन्हाळे गावच्या दोन किमी परिसरात बोराच्या आकाराचे गार पडल्याने परिसरातील शेतक-यांचे मका, गहू या बरोबरच सर्वात जास्त नुकसान उन्हाळी कांद्याचे व डोंगळ्यांचे झाले आहे.
पन्हाळे गावातील सूर्यभान वाघ या शेतक-याने आपली व्यथा मांडली. त्यांनी २० एकरात कांद्याची लागवड केली. लागवडीसाठी एकरी साठ हजार रुपये खर्च झाला. मात्र कालच्या गारपीटीमुळे कांद्याची पात तुटून पडल्याने कांदा पूर्णपणे पोसला जाणार नाही शिवाय त्याला आता बुरशी लागणे सुरु होऊन कांदा खराब होणार असल्याचे वाघ यांनी सांगितले.