पुणे – सध्या बदलत्या हवामानाच्या आणि दैनंदिन ताणतणावाच्या काळात शरीराची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, तसेच निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला पौष्टीक आणि सकस अन्न खावे. आपला आहार हा प्रथिने, जीवनसत्वे, कॅल्शियम आणि पौष्टिक घटकांनी परिपूर्ण असेल तर काहीही आजार होणार नाहीत. परंतु आजकाल अनेक नागरिक आपल्या आहारात बाहेरचे अन्नपदार्थ समाविष्ट करत आहेत, ते आपल्या शरीरासाठी घातक ठरतात. विशेषतः ३० किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी ते खूप हानिकारक असू शकते. वयाच्या तिशीनंतर या ४ गोष्टींचे सेवन केल्याने शरीराला मोठे नुकसान होते, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
बर्गर
बर्गर अनेकांना खूप आवडतात, परंतु अशा अन्नामध्ये ओमेगा -6 फॅटी अॅसिड आणि सोडियम सारख्या गोष्टींचे प्रमाण खूप जास्त आहे. या दोन्ही गोष्टी शरीरासाठी हानिकारक आहेत, त्यामुळे हृदयविकाराच्या व्यतिरिक्त इतर अनेक आजारांचा धोका देखील वाढतो.
एनर्जी ड्रिंक्स
जेव्हा आपण सहलीला किंवा पर्यटनस्थळी जातो किंवा आपल्या कामामुळे थोडे सुस्त वाटते, तेव्हा आपण एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करतो. परंतु त्यात साखर आणि कॅफीनचे प्रमाण जास्त असल्याने ते आपल्या शरीराला हळूहळू हानी पोहोचवते, त्याचा वाईट परिणाम आपल्या त्वचेवर आणि दातांवर दिसून येतो.
लाल मांस
लाल मांस खाण्यास स्वादिष्ट असू शकते, परंतु त्यात असलेले चरबी आणि कोलेस्टेरॉल आपल्या शरीरासाठी फायदेशीर नाही. त्यात मोठ्या प्रमाणात सोडियम देखील आढळते, त्यामुळे आपला रक्तदाब देखील वाढू शकतो. तसेच लठ्ठपणा, संधिवात आणि हृदयाशी संबंधित रोगांचा धोका होऊ शकतो.
सोडायुक्त पेय
सोडायुक्त पेय आपल्या शरीरासाठी फायदेशीर नसतात, कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यात असलेले कॅफीन आणि रंग देखील आपल्या शरीराला अनेक प्रकारे हानी पोहोचवण्याचे काम करतात. तसेच रोज सोडायुक्त ड्रिंक्सचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोकाही लक्षणीय वाढतो.