इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात स्लिम – ट्रिम असण्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा बारीक दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डाएट पाळले जाते. यासाठी अनेक टिप्स घेतल्या जातात, आणि त्या काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही देखील तुम्हाला वजन कमी करण्याचा एक उपाय सांगणार आहोत.
सामान्यपणे दूध सगळेच पितात. त्यात काही ना काही घालून दूध प्यायले जाते. पण तुम्ही कधी दुधात गूळ घालून प्यायला आहात का? बहुतेकांचं उत्तर नाही असंच असेल. पण दुधात गूळ घालून प्यायल्याने वजन कमी व्हायला मदत होते. असंही साखरेपेक्षा गूळ कधीही आरोग्यदायी असतो. गुळात असलेले लोह, ग्लुकोज तसेच खनिज आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचा शरीराला फायदा होतो. दुधातील कॅल्शिअम तसेच गुळातील आयर्न अर्थात लोह एकत्रित आल्याने आपल्याला लाभदायी ठरते. सांधेदुखीवरही हे उपयुक्त आहे.
दूध आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे
दूध आणि गूळ एकत्र घेतल्याने पचनशक्ती सुधारते. गुळामुळे पचनक्रियेशी संबंधित अनेक अडचणी दूर होतात. यामुळेच गरम दुधासोबत गुळाचा तुकडा खावा.
सांधेदुखीवरही गूळ आणि दूध हा चांगला उपाय आहे. गुळातील लोह आणि दुधातील कॅल्शिअम आणि ‘ड’ जीवनसत्त्व यांमुळे सांधे मजबूत होतात.
ज्यांना दम्याचा त्रास असतो त्यांना देखील गूळ खाण्याचा फायदा होतो. गूळ उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीराचे तपमान योग्य ठेवण्यासाठी गुळाचे सेवन उपयोगी ठरते.
शरीरातील रक्ताची कमतरता कमी करण्यासाठी गुळाचा उपयोग होतो. गुळातील तत्त्वांमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असेल तर त्यावरही गूळ खाणे उपयुक्त ठरू शकते.
वजन कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा फायदा होतो. गरम पाण्यासोबत मध प्यायल्याने वजन कमी होतं, हे आपल्याला ठाऊक असत. त्याप्रमाणेच गुळाचाही उपयोग होतो. गूळ हा केमिकल फ्री प्रक्रियेतून तयार होतो. म्हणूनच साखरेपेक्षा गुळाला अधिक प्राधान्य दिलं जातं. डॉक्टरही गूळ खावा असं सांगतात. दररोज रात्री गरम दुधासोबत गूळ खाल्लात तर वजन कमी होऊ शकतं.
Health Tips Weight Loss Obesity Home Remedies