विशेष प्रतिनिधी, नागपूर
गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टी ट्रेंडींगमध्ये आहे. डॉक्टरसुद्धा वजन वाढत असलेल्या लोकांना ग्रीन टी पिण्याचा सल्ला देतात. याशिवाय अनेक आजारांवर ग्रीन टी उपयुक्त आहे. मधुमेह असलेल्यांनाही ग्रीन टी एक उत्तम पेय आहे. तज्ज्ञांनी तर लिंबू आणि दुधाएेवजी ग्रीन टी प्यायला हवे हेच सांगितले आहे.
जर तुम्हाला मधुमेह असेल आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही बार्ली चहा पिऊ शकता. अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की बार्ली चहा ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो.
बार्ली काय आहे
सनातन धर्मात बार्लीचे म्हणजे जवाचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळ्यांमध्ये जवाचा वापर केला जातो. शास्त्रांमध्ये उपवासाच्या दिवशी जव खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे व्रत–वैकल्य आणि सणांना जवाचा वापर होतो. प्राचीन काळापासून जवाची शेती केली जात आहे, असे इतिहासकार म्हणतात.
आयुर्वेदात तर जवाला औषधाचा दर्जा आहे. यात अनेक औषधीय गुण आहेत. हे गुण आरोग्यासाठी तर उत्तम आहेतच शिवाय सौंदर्य कायम ठेवण्यासाठीही फायद्याचे आहेत. जवाचा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि हाडांमध्ये शक्ती निर्माण करतो. तसेच पाचनतंत्र मजबूत करतो.
रिसर्च गेटमध्ये प्रकाशित एका लेखात जवावरील संशोधन प्रसिद्ध झाले आहे. जवात बिटा–ग्लूरेन, फायबर आणि फायटोस्टेरोल्ससारखे महत्त्वपूर्ण तत्व असल्याचे यात सांगितले आहे. सोबतच यात झिरो कॅलरीज असतात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी तर हा चहा नियमीत घ्यायला हवा.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी जवाचे दाणे खाण्याचा सल्लाही एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनात दिला आहे. झोप येत नसेल, ताण आला असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी जवाचा चहा मदत करतो. या चहामुळे शरीरात मेलाटोनीन हार्मोन वाढविण्यास मदत होते. झोप न येण्याची समस्या त्यातून दूर होते. दररोज दोन कप बार्ली चहा प्यायलाच हवा.