पुणे – आधुनिक काळात हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेह हे तीन प्रमुख गंभीर आजार मानले जातात. सध्याच्या काळात मधुमेह या आजाराबद्दल केवळ भारतातच नव्हे तर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण मधुमेहामुळेच कालांतराने हृदयरोग सारखा आजार बळावू शकतो. यासाठी सर्वांनीच अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या आजारांविषयी जनजागृती देखील होणे आवश्यक आहे. अन्यथा काही वेळा गैरसमज निर्माण होऊन त्यातूनच शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडू शकते.
मधुमेह हा गेल्या काही दशकांमध्ये जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आहे. काही आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार, अलिकडच्या दशकात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जगात विशेषतः भारतात झपाट्याने वाढली आहे. कमकुवत जीवनशैली आणि पौष्टिक आहाराचा अभाव हे या आजाराचे मुख्य कारण बनू पाहत आहेत. मधुमेहामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी खालावते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, जागतिक स्तरावर ४२२ दशलक्षांहून अधिक लोक या गंभीर आजाराचे बळी बनले आहेत.
डब्ल्यूएचओच्या मते, मधुमेह या आजाराकडे सध्या जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण म्हणून पाहिले जाऊ शकते. मधुमेह हा केवळ एक आजार नाही, तर इतर अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो. लोकांना या गंभीर आजारापासून वाचवण्यासाठी, त्याबद्दल जनजागृती करणे महत्वाचे आहे. समाजात मधुमेहाविषयी पसरलेले अनेक समज गैरसमज लोकांना गोंधळात टाकत असल्याने काही लोक अशा समजांना सत्य मानत आहेत. अशाच काही समजांबद्दल जाणून घेऊ या…
जास्त फॅट युक्त पदार्थ (चरबी युक्त) आणि साखरेचे सेवन केल्यानेच मधुमेह होतो
तथ्य: आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेहासाठी अनेक घटक असू शकतात, केवळ अतिरिक्त चरबी आणि साखरेचा वापरच त्याला जबाबदार नाही. तसेच काही लोक लठ्ठ असून त्यांचे वजन जास्त असल्याने तणावाखाली राहील्यास त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असू शकतो. मधुमेह हा एक आनुवंशिक रोग देखील आहे, म्हणजेच एखाद्या कुटुंबात मधुमेहाची कोणतीही तक्रार असल्यास त्याचा धोका इतर लोकांमध्येही वाढतो. या व्यतिरिक्त, धूम्रपान, शारीरिक निष्क्रियता, वय आणि गर्भधारणा यामुळे लोकांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
टाइप १ मधुमेह अधिक धोकादायक असून टाइप २ कमी आहे
तथ्य: मधुमेहाचे कोणतेही स्वरूप ‘कमी’ धोकादायक नाही, असे आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. टाइप -1 टाइप -2 दोन्ही बाबतीत, त्याची काळजी घेण्यासाठी विशेष काळजी आणि प्रयत्न केले पाहिजेत. या दोन्ही स्थिती तो आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या धोकादायक रोगापासून बचाव करण्यासाठी, रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. या रोगामध्ये निष्काळजीपणा लक्षणे वाढवू शकतो, इतकेच नव्हे तर काही बाबतीत तो जीवघेणा देखील असू शकतो.
मधुमेह इन्सुलिन आणि औषधाने बरा होतो
तथ्य: आरोग्य तज्ज्ञांच्या मते , काही लोकांना असे वाटेत की, इन्सुलिन आणि औषध यामुळे मधुमेह दूर करता येईल, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. अशा उपायांमुळे लक्षणे कमी होण्यास मदत होतात. रोग मात्र बरा होत नाही. केवळ औषधे आणि इन्सुलिन या रोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकत नाहीत. यासाठी, रुग्णाने जीवनशैलीत बदल करत रहावे, तसेच आहार पौष्टिक ठेवावा. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर उपायांचा वापर करावा.
मिठाई आणि कार्बोहाइड्रेटचा (कर्बोदकांचा) वापर पूर्णपणे बंद केला पाहिजे.
तथ्य: मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराचे बंधन पाळले पाहिजे हे खरे आहे, असे आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, परंतु मिठाई, साखर आणि कर्बोदकांचा वापर पूर्णपणे बंद करणे हे खरे नाही. मधुमेहींनी नेहमी संतुलित आहार घ्यावा, त्यात शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक असतात. मिठाई आणि कार्बोहायड्रेट्सचे सेवन पूर्णपणे थांबवल्याने कमी साखरेची समस्या उद्भवू शकते, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कधीकधी कमी गोड पदार्थ खाल्ल्या जाऊ शकतात.
(सूचना : सर्व माहिती आरोग्य तज्ज्ञांच्या सूचनांच्या आधारे देण्यात आली आहे. वरील माहितीची इंडिया दर्पण कोणतीही जबाबदारी घेत नाही किंवा देत नाहीत. वरील बातमीत नमूद केलेल्या संबंधित आजाराबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)