इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका आणि माजी विरोधी पक्षनेत्या सुलभाताई उबाळे, भोसरी विधानसभा महिला आघाडी समन्वयक सुजाताताई काटे, शिवसेना संघटक संतोष सौंदाणकर व युवासेनेचे भोसरी विधानसभा शहर प्रमुख अजिंक्य उबाळे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी सुलभाताई उबाळे यांची महिला आघाडी उपनेतेपदी नियुक्ती करण्याचे जाहीर केले.
तसेच उपशहर संघटिका शशिकला उभे, विभाग संघटिका भारती चकवे, शाखाप्रमुख कावेरी परदेशी, उपशाखाप्रमुख निर्मला पाटील, प्रिया जपे, नयना पारखे, उपशाखा संघटिका लीलावती देवकाते, दिपा जागते, गटप्रमुख स्मिता मोगरे, लीना नेहते, मंदा पाटील तसेच पुणे महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांनीही पक्ष प्रवेश केला.
त्याचबरोबर उपशहरप्रमुख सुधाकर नलावडे, उपविभागप्रमुख गणेश झिळे, विभाग संघटक राजेंद्र पालांडे, उपविभागप्रमुख कौस्तुभ गोळे, शाखाप्रमुख महेश डोके, विजय घुले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील याप्रसंगी भगवा हाती घेत पक्ष प्रवेश केला.
…….