बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दररोज सकाळी मधाचे पाणी का पितात? काय फायदे आहेत त्याचे?

by India Darpan
ऑगस्ट 8, 2022 | 5:28 am
in राष्ट्रीय
0
Honey Water

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयुर्वेदामध्ये मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. मध हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करतात. तर काही जण पाककृतींमध्येही मधाचा समावेश करतात. चवीसोबतच मधामध्ये शरीरास उपयुक्त असणाऱ्या कित्येक पौष्टिक घटक आहेत.

रोज योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला प्रचंड फायदे मिळतात. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीर शुद्ध होण्यास मदत मिळते. रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. मधाचे सेवन केल्याने शरीराला लाभ होतो.

ज्यांना रात्रीची झोप येत नाही, त्यांच्या शरीरात स्लीपिंग हार्मोनचे प्रमाण अतिशय कमी असते. पुरेशा प्रमाणात झोप न मिळाल्यानं संपूर्ण शरीराचं कार्य बिघडते. अपूर्ण झोपेमुळे आपल्याला आजारांची देखील लागण होते. रात्रीची गाढ झोप मिळावी, यासाठी मधाचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. कारण मधामध्ये स्लीपिंग हार्मोन वाढीसाठी उपयुक्त घटक आहेत. यामुळे झोपण्यापूर्वी मधाचे सेवन केल्यास तुमचे झोपेशी संबंधित समस्या कमी मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचा वापर करून अनेक पदार्थ बनवता येतात.

नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वाढवते देखील. मधामध्ये व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.

कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. तसेच उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते. रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे. हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.

रोज मध खाल्याने आरोग्य चांगले राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो. मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल. रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे. तसेच टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो. मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो. मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

मधामध्ये दाहक-विरोधी, औषधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे विविध रोगांवर मात करता येते. याशिवाय, हे अनेक प्रकारे फायदेशीर देखील असू शकते. तर जाणून घ्या मधाचे पाणी पिण्याचे आरोग्यासाठी असणारे आश्चर्यकारक फायदे.
मधामध्ये फायबर असते, त्यामुळे ते पचनासाठी चांगले असते. मधाचे पाणी पोटामधील सूज कमी करते आणि पचन सुधारते. मधाचे पाणी आपल्या शरीरातील हानिकारक रसायनांचे प्रमाण कमी करते जे ब्लोटिंग आणि गॅससाठी जबाबदार असतात. याशिवाय मधामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की एक ग्लास कोमट मध पाणी प्यायल्याने सामान्य सर्दी, ताप आणि खोकला टाळता येतो. अशा परिस्थितीत तुम्ही रोज सकाळी हे जादुई मिश्रण पिऊ शकता. याने तुमची सर्दी कोणत्याही केमिकल टॅब्लेट्स खाल्ल्याशिवाय बरी होऊ शकते. खराब पचन, बद्धकोष्ठता आणि इतर पाचन समस्यांमुळे वजन वाढते. मधाचे पाणी या सर्व समस्यांशी लढते आणि तुमचे मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. यासोबतच रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट मध पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

मधाचे पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव होतो. जर तुम्हाला तुमचा रक्तदाब, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल तर या जादुई पेयाने दिवसाची सुरुवात करा. डिहायड्रेशनमुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होऊ शकते. त्यामुळे सकाळी योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमची त्वचा दिवसभर ताजी आणि मुलायम राहते. मध पाणी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी गरम करा. त्यानंतर त्यात एक चमचा मध घालून चांगले मिसळा, त्यात १ चमचा लिंबाचा रस देखील टाकू शकता.हे पेय रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्याचा चांगला फायदा होतो.

Health Tips Honey Water Drinking Benefits

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

४८ कोटींची खोटी बिले देणे भोवले; मुंबईतील कंपनीच्या मालकाला अटक

Next Post

कोणती SUV कार बेस्ट? टाटा पंच की सिट्रॉन सी ३? बघा, तज्ज्ञ काय म्हणताय…

Next Post
Citroen C3 Car

कोणती SUV कार बेस्ट? टाटा पंच की सिट्रॉन सी ३? बघा, तज्ज्ञ काय म्हणताय...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011