मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
सध्याच्या काळात ताणतणाव धावपळीची जीवनशैली आणि अयोग्य आहारमुळे माणसाला अनेक प्रकारचे आजार बळावतात. त्यातच सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या आजारांमुळे अनेक जण त्रस्त असतात. पूर्वीच्या काळी पाठदुखीचा संबंध वाढत्या वयासोबत होता. त्यामुळे ही समस्या बहुतेक वृद्ध नागरिकांमध्ये दिसून येत असे. पण आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि लॅपटॉपसमोर तासनतास बसून राहिल्याने बहुतांश नागरिकांना पाठदुखीची समस्या भेडसावू लागली आहे. पाठदुखीमुळे कोणतेही काम करणे कठीण होऊन बसते. कोणालाही पाठदुखीचा त्रास होत असेल, तर काळजी करू नका आणि दालचिनीच्या या प्रभावी उपायांची मदत घ्या.
दालचिनी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यात फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त यांसारख्या अनेक घटकांसह सिनामल्डिहाइड आणि सिनामिक ऍसिड सारखे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म देखील आहेत. त्यामुळे शरीरातील खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत होते आणि सांधेदुखी, सांधे आणि पाठदुखीमध्ये आराम देते.
पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी दालचिनीची ही रेसिपी फॉलो करा-
– पाठदुखीची समस्या दूर करण्यासाठी दोन ग्रॅम दालचिनी पावडरमध्ये १ चमचा मध मिसळा. नंतर चाटून घ्या.
– ही रेसिपी दिवसातून किमान दोनदा करावी. पाठदुखीमध्ये लवकर आराम मिळेल.
– पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दालचिनीपासून बनवलेल्या हेल्दी ड्रिंकचीही मदत घेऊ शकता.
– यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी टाकून त्यात थोडी दालचिनी पावडर टाकून मंद आचेवर उकळा.
– आता हे पाणी एका कपमध्ये गाळून घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळून प्या. हे पेय रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.