India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पाचनशक्तीसाठी द्राक्ष हे उत्तम औषध! त्याशिवाय एवढे सारे आहेत त्याचे फायदे…

India Darpan by India Darpan
February 10, 2023
in राष्ट्रीय
0

 

नितीन नायगावकर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
द्राक्षांमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, क जीवनसत्व बऱ्याच प्रमाणात असतं, हे सर्वांना माहिती आहे. आता द्राक्षाचे उपयोग बघायला गेलो तर बरेच आहेत. म्हणजे वाईन तयार करण्यापासून ते पौष्टिक मनुकांपर्यंत. पण हीच द्राक्ष पाचनशक्तीच्या विकारावरील उत्तम असं औषध आहे, असही म्हटलं जातं.

द्राक्षांमध्ये फलशर्करा असते. आणि ती नैसर्गिक असल्यामुळे आपण द्राक्षांचं सेवन करताच थकवा दूर झाल्यासारखा वाटतो. एवढच नाही तर द्राक्ष खाल्ल्यावर ऊर्जाही निर्माण होते. त्यामुळे द्रांक्षांना आजारपणावरील उत्तम असं औषध मानलं जातं. त्यामुळे आजारी माणसासाठी फळं घेऊन जाताना त्यात द्राक्ष नक्की सोबत घेतली जातात. शरीरातील पचनक्रियेसाठी ग्लुकोज आवश्यक असते.

द्राक्ष ही गरज भागवतात. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी द्राक्ष हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. पण तरीही खूप आंबट किंवा कच्ची द्राक्ष खाऊ नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. तसे केल्यास अशक्तपणा येऊ शकतो किंवा जुलाब होणे वा अतिप्रमाणात लघवी होणे, हे देखील शक्य आहे. ही द्राक्ष बाजारातून आणल्यावर तशीच खाण्याची आपल्याला सवय आहे. पण मुळात तसे करू नये, असा सल्ला तज्ज्ञ देतात. द्राक्षांवर किटकनाशक असतात. त्यामुळे ती घरी आणल्यानंतर धुवूनच खायला हवी.

स्त्रीयांसाठी आवश्यक
स्त्रीयांच्या निरोगी आयुष्यासाठी द्राक्ष आवश्यक असल्याचे डॉक्टर मंडळी सांगतात. लोह, कॅल्शीयम आणि ग्लुकोज असल्यामुळे रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे फळ आहे. त्याचवेळी लहान मुलांनाही नियमीत द्राक्ष खायला द्यावी, असे डॉक्टर सांगतात.
दातांमध्ये मजबुती
दात पडणार आहेत किंवा दात हलत आहेत, असे वाटत असेल तर दररोज द्राक्षरस व आवळा चुर्ण एकत्र करायचे आणि त्याचा रस काहीवेळ तोंडात धरून ठेवायचा. जेणेकरून हिरड्यांमधून रक्त येणं बंद होतं आणि दातांना मजबुतीही मिळते, असे डॉक्टर मंडळी सांगतात.

Health Tips Grapes Digestion Benefits Nutrition


Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर; या विकासकामांचे करणार उदघाटन

Next Post

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची अशी आहे दिनचर्या…. सकाळी केव्हा उठतात? रात्री किती वाजता झोपतात? असे आहे त्यांच्या वेळेचे नियोजन

Next Post

सरन्यायाधीश चंद्रचूड यांची अशी आहे दिनचर्या.... सकाळी केव्हा उठतात? रात्री किती वाजता झोपतात? असे आहे त्यांच्या वेळेचे नियोजन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group