पुणे – सुका मेवा, विशेषतः बदाम खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचेही अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे काही वेळा आरोग्य तज्ज्ञ देखील का काजू बदाम सारखे ड्रायफ्रूट्स खाण्याचा सल्ला देतात. बदामामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि चांगले फँटस् यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो, बदाम शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतात. म्हणूनच डॉक्टर हिवाळ्यात बदाम खाण्यास सांगतात. तथापि, बदाम जास्त प्रमाणात खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत.
बदामाचे जास्त सेवन केल्याने वजन वाढण्याचा धोका असतो, तर डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. बदामामुळे शरिरात उष्णता व गरमी वाढत असते, त्यामुळे बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला योग्य ठरेल का ? चला जाणून घेऊ या…
बदाम किती खावेत
बदाम भिजवल्याने त्यामध्ये असलेले फायबर पचण्यास सोपे जाते. अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या मते, मोठ्या प्रमाणात बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. म्हणून, दररोज सुमारे १५ नग ( ४० ग्रॅम) बदाम खाणे फायदेशीर आहे. तसेच, भिजवलेले बदाम कच्च्या किंवा भाजलेल्या बदामापेक्षा जास्त गुणकारी असतात.
सेवन कसे करावे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बदाम भिजवल्याबरोबर बदामामध्ये आढळणाऱ्या प्रोटीनची पातळी वाढते. बदाम रात्रभर भिजवून खावेत, यामुळे त्यात असलेले गरम घटक बर्याच प्रमाणात दूर होतात. तसेच, भिजवलेल्या बदामातील पोषक घटक सुकलेल्या बदामापेक्षा जास्त असतात.
लठ्ठपणा वाढतो
बदामामध्ये जास्त प्रमाणात फॅट आणि कॅलरीज शरीरात असल्याने आपण लठ्ठ होऊ शकता. तसेच शारीरिक हालचालींपासून दूर राहिल्यास कॅलरीज सहजासहजी बर्न होत नाहीत त्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते. अशा स्थितीत जास्त बदाम खाणे हानिकारक तर आहेच, पण त्यामुळे आपले वजनही वाढेल.
गंभीर समस्या
जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि लूज मोशन होऊ शकते. याशिवाय बदामामध्ये आढळणाऱ्या प्रोटीनमुळे तोंड, घसा आणि घशात खाज येणे, तसेच जीभ, तोंड आणि ओठांना सूज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर बदाम जास्त खाल्ल्याने शरीरातील मॅंगनीजचे प्रमाणही वाढते, त्यामुळे रक्तदाब वाढून प्रतिजैविकांच्या औषधांचा प्रभावही कमी होतो.