India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चहासोबत हे पदार्थ बिल्कुल खाऊ नका हे आहे कारण…

India Darpan by India Darpan
July 24, 2022
in राज्य
0

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात चहाला अमृततुल्य असे म्हटले जाते, सकाळी उठले की, बहुतांश जण चहा पितात, परंतु त्याच बरोबर चहा सोबत काही जण बिस्कीट किंवा अन्य पदार्थही खातात. परंतु चहा सोबत काही खाताना निश्चितच याबाबत विचार करणे आवश्यक आहे की, ते पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट आहेत.

चहामध्ये असे अँटीऑक्सिडंट असतात, जे यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. काळा आणि हिरवा चहा यकृतातील एन्झाईम्स आणि फॅट्सची पातळी सुधारण्यास मदत करतो. विशेषतः, ग्रीन-टी यकृत एंझाइम पातळी सुधारू शकते, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि यकृत चरबी कमी करू शकते.

दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये हे फार कमी जणांना माहीत आहे. यामध्ये असलेल्या कॅफीनमुळे पोटात गॅसची समस्या होऊ शकते आणि त्यामुळे पोटाशी संबंधित आजारांना बळी पडू शकता. चहासोबत हमखास काही जणांना बिस्किटं खायला आवडते. कुणाला चहासोबत ब्रेड आणि बटर खायला आवडते. तर कुणी चहासोबत खारी- टोस्ट असे पदार्थ खातात.

पावसाळी वातावरणात जर संध्याकाळचा चहा घेत असाल तर मग त्यासोबत भजी, सॅण्डविज, मॅगी किंवा असेच काहीसे खमंग पदार्थ हमखास संपवले जातात. चहासोबत अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद निश्चितच वेगळा आहे. पण चहासोबत किंवा चहा घेतल्यानंतर आपण लगेचच काय खाऊ नये कारण यामुळे विरुद्ध अन्न एकत्र येऊन त्यांची आपापसात रिॲक्शन होते आणि त्याचा तब्येतीवर वाईट परिणाम होतो.

दुधाला पूर्ण अन्न म्हटले जाते, त्यामुळे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकानेच ते प्राशन केले, तर त्यामुळे आरोग्य चांगले राहते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. परंतु अलीकडच्या काळात दुधाऐवजी चहा आणि कॉफीचा वापर वाढला आहे. मात्र त्यासाठी घरोघरी दूध आणण्यात येतेच, चहा किंवा दूध घरी आणल्यावर वारंवार तापविल्याने किंवा उकळल्याने त्यातीत पोषक घटक नष्ट होतात.

सध्या पावसाळा असून आता चहा आणि भजी हे एक जबरदस्त हिट कॉम्बिनेशन मानले जाते पण चहासोबत किंवा चहानंतर लगेचच बेसन असणारे पदार्थ खाल्ले तर चहातील टॅनिनमुळे शरीरातील पोषक घटक रक्तात मिसळण्यास अडथळा येतो. त्यामुळे चहा- भजी हे खाणे आहारतज्ज्ञांच्या दृष्टीकोनातून फारसे योग्य नाही.

चहासोबत किंवा चहा घेतल्यानंतर लगेचच सुकामेवा किंवा सुकामेव्याचा भरपूर वापर असणारे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या असणारे पदार्थ किंवा लोह भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ खाऊ नयेत, असे हॉर्वर्ड विद्यापीठातील न्युट्रीशन विभागातर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात सांगितले आहे. चहा घेतला की आपल्या शरीरात त्यामध्ये असणारे टॅनिन आणि ऑक्झालेट जाते. याचा शरीरावर वाईट परिणाम होतो.

सकाळी किंवा सांयकाळी गरम चहा प्यायल्यानंतर लगेचच कोणताही थंड पदार्थ खाणे, थंड पदार्थ खाल्यानंतर किंवा प्यायल्यानंतर गरमागरम चहा पिणे, या दोन्ही गोष्टी टाळायला पाहिजेत. कारण हे दोन विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ एकानंतर एक घेतले तर त्याचा पचनावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे ॲसिडीटी, गॅसेस असे त्रास होऊ शकतात.

दूधाचा चहा आणि त्यानंतर व त्यासोबतच लिंबू असणारा एखादा खाणे टाळा. चहामध्ये असणारे घटक आणि लिंबामधलं सायट्रिक ॲसिड यांची एकमेकांशी रिॲक्शन होऊन त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. काही जणं लेमन टी, ग्रीन टी घेणे पसंत करतात. पण आहारतज्ज्ञांच्या मते ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्यांनी लिंबू असलेला ग्रीन टी, लेमन टी घेणे टाळावे.

Health Tips Don’t Eat These Things With Tea


Previous Post

बँका आता घेणार हा मोठा निर्णय; ग्राहकांना होणार फायदाच फायदा

Next Post

‘हंगामा प्ले’वर सुरू होणार ही नवी क्राइम थ्रिलर मालिका

Next Post

'हंगामा प्ले'वर सुरू होणार ही नवी क्राइम थ्रिलर मालिका

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group