इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – हिरव्या भाज्या, फळे, सुका मेवा यांचे आरोग्यासाठी फायदे असतात, तसेच वेगवेगळ्या डाळी सुद्धा शरीराला पौष्टिक तत्व पुरवतात. उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो. तसेच उडदाच्या डाळीचा पापड आरोग्याला फायदे आणि तोटे जाणून घेऊ या..
उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात. एकूणच निसर्गाने आहारातून दिलेले पौष्टिक तत्त्व, आपल्याच हलगर्जीपणामुळे कमी पडू लागतात तेव्हा अनेक आजार आपल्या शरीरात वाढू लागतात.
प्रत्येक घटकांचे सेवन करताना शरीर प्रकृती विचारात घेणे गरजेचे आहे, तसेच उडदाच्या डाळी बद्दल सुद्धा एक काळजी घेतली गेली पाहिजे. उडदाच्या डाळीत असलेल्या फायबर्स मुळे, रक्तातील इन्श्युलीन आणि ग्लुकोज संतुलित ठेवायला मदत मिळते. मधुमेह म्हणजेच डायबिटीस मध्ये इन्श्युलीन आणि ग्लुकोज चे संतुलन राखले गेले तर त्या परिस्थितीत मधुमेहींना सामान्य जीवन जगणे सोपे जाते. शरीराच्या एखाद्या भागाला मार लागून सुजणे, दुखणे अशा वेळी उडदाच्या डाळीचे सेवन फायदेशीर ठरते. सांधे दुखीच्या आजारात सांध्यांना लावण्याच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये उडदाच्या डाळीचा उपयोग केलेला असतो. सांधे दुखत असल्यास किंवा काही मुक्का मार लागून दुखत असल्यास, सुजल्यास त्यावर उडदाच्या डाळीचा लेप सुद्धा गुणकरी ठरतो.
पापड पचनक्रियेसाठी लाभदायक मानला जातो. जेव्हा आपण खुपच जड आहार घेतो म्हणजेच आहारात जास्त कॅलरीज असलेले पदार्थ, तळलेले पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ खातो. तेव्हा पापड ते जड अन्न पचवण्यासाठी आपल्या पचनकेंद्राची मदत करतात. कारण पापड हे विविध डाळींपासून बनवले जातात. त्यामुळे त्यामध्ये पोषक तत्वांचीही भरपूर मात्रा उडदाच्या डाळीच्या अति सेवनाने शरीरातील युरिक अॅसिडमध्ये वाढ होते.
साधारणत: पापड हे मुगडाळ किंवा उडदाच्या डाळीपासून बनवले जातात. या डाळींना रात्रभर पाण्यात भिजवून आणि सकाळी त्या बारीक वाटून त्याचे मिश्रण केले जाते. या मिश्रणापासून पापड करण्याची खूप जुनी परंपरा आहे. सोबतच हे पापड बनवताना त्यामध्ये ओवा, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ मिक्स केले जाते. या तिन्ही गोष्टी पापडांचा स्वाद वाढवण्यासोबतच त्याच्या गुणधर्मांमध्येही वाढ करतात.
पापड हे मुख्यत्वे उडदाची डाळ, मसूर डाळ, मुग डाळ, चणा डाळ या डाळींपासूनच तयार केले जातात. म्हणजेच डाळ हा पापडातील मुख्य पदार्थ असतो. यामध्ये मुगाच्या डाळीपासून तयार होणारे पापड पचनक्रियेस सर्वात जास्त कारक मानले जातात. त्यामुळे मुग डाळीचे पापड त्यामध्ये जिऱ्याचा फ्लेवर असतो तेच जास्त खाल्ले जातात. तर पापड खाण्याचा कोणताही वेळ नसतो. आठवण होताच ते भाजून किंवा तळून खाऊ शकता.
किडनी स्टोन, गाऊट यांसारखे आजार असल्यास उडदाच्या डाळीच्या पापडच्या सेवना बद्दल आपले डॉक्टर किंवा आहारतज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. कारण कुठलाही पदार्थ पचतो म्हणजे आतड्याच्या क्षमतेनुसार त्या पदार्थाचे पचन होत असते. उडदाच्या डाळीचा पापड आरोग्याला काही प्रमाणात हानिकारक असतो, कारण त्यात असलेले सोडियमचे अतिरिक्त प्रमाण शिवाय तळताना तयार होणारे तेलाचे शोषण होय.
उडदाचा पापड अनेक घरांमध्ये नियमीत आणि आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ होय. कधी मसाला पापड तर कधी मूगाच्या कोशिंबीरीत किंवा चिवड्यातही पापड घालून खाल्ला जातो. पूर्वी घरोघरी खूप प्रमाणात केले जाणारे उडदाचे पापड आता बाजारातही सहज मिळत असल्याने सर्रास तळून किंवा भाजून खाल्ले जातात. मात्र पापड आरोग्यास किती चांगला असतो याचा आपण पुरेसा विचार केलेला असतोच असे नाही.
वजनाला हलका वाटणारा पापड पचायला मात्र जास्त जड असतो याबाबत आपल्याला माहिती नसते. मुळात पापडात टाकला जाणारा पापडखार हा पापडाला जड करतो. त्यामुळे ज्यांना ह्रदय, किडनी किंवा ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांनी पापड खाणे टाळावे. तसेच ज्यांना जास्त अॅसिडिटीचा त्रास आहे त्यांनीही पापडापासून दूरच राहायला हवे. पापडामध्ये फायबर नसल्याने त्याचे पचन होताना आतड्यांवर ताण येतो. तसेच पापडांमुळे इतर खाद्यपदार्थ पचनासही अडथळा निर्माण होतो. त्याने पोटाचे विकार वाढण्याची शक्यता असते.
इतर डाळीच्या तुलनेत उडीद डाळ ही पचवायला जड असते. त्यामुळे इतर कुठल्याही डाळींमधील प्रोटिन्सपेक्षा उडदाच्या डाळीमध्ये असणारे प्रोटिन्स तुलनेने उशीरा पचतात. शरीराला प्रोटिन्समधून अमिनो अॅसिडस वेगळे काढायचे असतात. ही प्रक्रिया कोणत्याही पदार्थातील प्रोटिन्समधल्या अमिनो अॅसिडचा क्रम आणि प्रमाण ह्यावर अवलंबून असते. उडदाच्या डाळीचा पापड आरोग्याला नक्कीच हानिकारक असतो कारण त्यात असलेले सोडियमचे अतिरिक्त प्रमाण होय,आतड्याच्या क्षमतेनुसार त्या पदार्थाचे पचन होत असते. त्यामुळे पापड खाताना काळजी घ्यावी.
Health Tips Daily Papad Eating Benefits Loss Nutrition
Food