शनिवार, नोव्हेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

तुम्ही दररोज ब्रेड खाता? आधी हे वाचा मग ठरवा

ऑगस्ट 15, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
Milk Bread

मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सकाळच्या नाश्त्याला अनेक जण ब्रेड आणि बटर (लोणी) खातात. ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. हा घटक शरीरासाठी इंधन म्हणून काम करतो, परंतु जेव्हा ते इतर पोषक तत्वांमध्ये मिसळले जाते तेव्हा ते निरोगी असते. यामुळे फळे आणि भाज्यांमधून मिळणारे कार्बोहायड्रेट्स अधिक आरोग्यदायी मानले जातात. पॅक केलेल्या आणि कापलेल्या ब्रेडमध्ये अत्यंत प्रक्रिया केलेले साधे कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे ते लवकर पचते, त्यामुळे शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत आणि भूकही लवकर लागते ज्यामुळे वजन वाढते.

ब्रेडचे पदार्थ लवकर पचतात. त्यामुळे सारखी भूक लागते, हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं. ब्रेड खाण्यास आवडत असलं तरी ब्रेड पचन व्यवस्थेवर विपरित परिणाम करतं.ब्रेड आणि ब्रेडच्या पदार्थांमुळे रक्तातील साखर एकदम वाढते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. नाश्त्याला रोज ब्रेड बटर, ब्रेड जॅम, सॅण्डविच असे ब्रेडचे पदार्थ पटकन होतात व आवडीने खाल्ले जातात.

मुळात ब्रेड हे आपल्या देशाचे स्थानिक अन्न किंवा आहार नाही. पण सध्या आहारात ब्रेडचा समावेश बघता तो मूळ पदार्थ असल्यासारखा वाटतो. ब्रेडचे पदार्थ कधी तरी खाणं योग्य असले तरी आरोग्याचा विचार करता रोज ब्रेड खाणं आरोग्यास अपयकारक ठरतं असं आहार तज्ज्ञ सांगतात. ब्रेड खाण्याचे अपाय समजून घेतल्यास रोज ब्रेड खाणं अपायकारक कसं हे लक्षात येईल.

खरे म्हणजे रोज ब्रेड खाल्ल्यास वजन वाढतं. कारण ब्रेडमध्ये कर्बोदकं, मीठ, साखर, मैदा यांचा समावेश असतो. हे घटक वजन वाढण्यास कारणीभूत ठरतात. ब्रेडचे पदार्थ लवकर पचतात. त्यामुळे सारखी भूक लागते, सारखं खावंसं वाटतं. यामुळे वजन वेगानं वाढू शकतं. वजन कमी करायचं असल्यास नाश्त्याला रोज ब्रेड खाणं अपायकारक आहे. उलट नाश्त्याला प्रथिनंयुक्त पदार्थ असायला हवेत.

विशेष म्हणजे सकाळी ज्या पदार्थांनी रक्तातील साखर एकदम वाढते असे पदार्थ खाणं टाळायला हवं. ब्रेडमुळे रक्तातील साखर एकदम वाढते. ब्रेड लवकर पचतं आणि रक्तातील साखर एकदम वाढते. रोजच्या आहारात ब्रेड असल्यास मधुमेह होण्याचा धोका असतो. ब्रेडमध्ये सिम्पल कर्बोदकं असतात, त्यामुळे ते सहज पचतात आणि मधुमेहाचं कारण ठरतात. त्यामुळे नाश्त्याला रोज ब्रेड व ब्रेडचे पदार्थ खाणं चुकीचे आहे.

नाश्त्याला ज्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जे खाल्ल्यानंतर पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं असे पदार्थ हवेत. ब्रेडमध्ये फायबरचं प्रमाण अत्यंत नगण्य असतं. यामुळे ब्रेड खाल्ल्यानं पचनक्रिया बिघडू शकते. ब्रेड खाल्ल्यानं चयापचय क्रियेचा वेग मंदावतो. याचा परिणाम म्हणजे बध्दकोष्ठतेचा त्रास होतो. ब्रेडच्या ऐवजी नाश्त्याला प्रोबायोटिक पदार्थ असावेत. पोटासाठी उपयुक्त जिवाणुंना प्रेरणा देणारे चयापचय क्रियेचा वेग वाढवणारे पदार्थ नाश्त्याला खायला हवेत.

ब्रेडची जलद पचणारी गुणवत्ता देखील रक्तातील साखरेसाठी चांगली नाही. वास्तविक, जेव्हा पोट अन्न पचवते तेव्हा त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. जास्त फायबर असलेले पदार्थ ही पातळी हळूहळू वाढवतात परंतु ब्रेड लवकर पचते, ज्यामुळे इन्सुलिनची पातळी वेगाने वाढते, विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले नाही, त्यामुळे ब्रेड खाण्यास आवडत असलं तरी ब्रेड पचन व्यवस्थेवर विपरित परिणाम करतं. ब्रेड खाल्ल्यानंतर अनेकांना पोटात गॅसेस होतात. अनेकजण ब्रेड नीट पचवू शकत नाहीत. त्यामुळे दिवसभर छातीत जळजळ होणं, पोटात गॅसेस होणं या समस्या जाणवतात.

नाश्त्याला कधीतरी ब्रेड, ब्रेडचे पदार्थ खाणं वेगळं आणि रोज खाणं वेगळं. रोज ब्रेडचे पदार्थ खाल्ल्यास त्याचे अपाय होणारच. ज्या दिवशी नाश्त्याला ब्रेडचे पदार्थ असतील त्या दिवशी ब्रेडचे अपाय टाळण्यासाठी प्रथिनं आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्त प्रमाणात करायला हवा. तसेच मैद्याच्या ब्रेडऐवजी ब्राउन ब्रेड खाल्ल्यास ते कमी अपायकारक ठरतात. आपण जर रोज ब्रेड खात असाल तर त्यामधील अस्वास्थ्यकर घटकांमुळे मधुमेह, हृदयविकार आणि लठ्ठपणा असे अनेक आजार होऊ शकतात. यासोबतच ब्रेडमध्ये असलेले ग्लूटेन या घटकाची अॅलर्जी असलेल्यासाठी धोकादायक ठरू शकते.

जर ब्रेड खायचा असेल तर संपूर्ण धान्य ब्रेड खरेदी करा. पॅकेटवर ते चांगले नमूद केलेले आहे का ते तपासा. या ब्रेडचे वैशिष्ट्य म्हणजे यात फायबरचे घटक असतात, ज्यामुळे रिफाइंड पिठापासून बनवलेल्या ब्रेडसारखे नुकसान होत नाही. मल्टीग्रेन ब्रेडही बाजारात उपलब्ध आहे. हा देखील ब्रेडचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये फायबरसोबतच अनेक जीवनसत्त्वे देखील असतात ज्यामुळे शरीराला फायदा होतो.

तसेच भाजी, मोड आलेले कडधान्य किंवा इतर आरोग्यदायी गोष्टींसोबत ब्रेड खा. अशाप्रकारे तुम्हीही रिफाइंड पिठापासून बनवलेली भाकरी खाल्ल्यास भाज्यांमध्ये असलेले फायबर त्यामुळे होणारे नुकसान नियंत्रित करेल आणि तुमचे शरीर आरोग्याची पातळी राखण्यास सक्षम असेल. अनेकदा लोक सँडविच बनवताना त्यात बटाटे, मांस किंवा तळलेले पदार्थ भरतात, ज्यामुळे शरीराला आणखी नुकसान होते. निरोगी राहण्यासाठी हे टाळा.

Health Tips Daily Bread Eating Habit Effect Side Effects

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शनीच्या साडेसातीविषयी जाणून घ्यायचं आहे? मग हे वाचाच…

Next Post

अविवाहित महिलांच्या लाभासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
SC2B1

अविवाहित महिलांच्या लाभासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिला हा निकाल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011