माणिकराव खुळे, हवामानतज्ञ
१- सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एक डिग्रीने कमी तर पहाटेचे किमान एक डिग्रीने वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा आल्हाददायक पणा तर रात्री ऊबदारपणा जाणवत आहे.
२- उर्वरित महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात परिस्थिती अशीच असली तरी पहाटेचे किमान तापमानातील वाढ ही अत्याधिक असल्यामुळे थंडीचा प्रभाव काल शनिवार दि.११ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात कमी झाला आहे.
३-बं.उपसागराततून वारे महाराष्ट्रावर आर्द्रता आणत असल्यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रभाव असाच कमी जाणवणार आहे.
४- सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यानच्या तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल, असे वाटते. थोडक्यात संपूर्ण जानेवारी महिन्यात असाच थंडीचा चढ-उतार जाणवेल, असे वाटते.
माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune