मुंबई – मध्यंतरीच्या काळात आणि खासकरुन निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात अनेक मंत्र्यांसह मातब्बर नेत्यांचा समावेश होता. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी अखेर एक मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या खुलाशाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. अनेक जण मला विचारतात की, तुम्ही भाजपमध्ये का गेलात. त्याचे उत्तर हे आहे की, मला रोज मस्त आणि शांत झोप लागते. कसली चौकशी नाही की अन्य काही, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या खुलाशाची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगते आहे. बघा त्यांचा हा व्हिडिओ
https://twitter.com/BodkheShilpa/status/1448172562366619651