अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृतमोहत्सवी ७५ वा वर्धपान दिन हरीण पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ममदापुर हरीण संवर्धन राखीव येथे वनविभागातर्फे जल्लोषात पार पडला, राजापूर येथील शहिद वीर जवान संतोष विठ्ठल अलगट यांचे वडील विठ्ठल अलगट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,यावेळी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ,सुजित नेवसे यांच्या हस्ते राजापूर,खरवंडी,ममदापुर,देवदरी, खरवंडी,सोठणजोश गावातील शाहिद जवानांचे कुटुंब,सेवानिवृत्त सैनिक, तसेच सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असलेले सैनिक यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला ,या कार्यक्रमासाठी गणाधीश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व वनविभागाचे कर्मचारी यांनी १०० फूट लांबीचा तिरंगा तयार केला होता,मनमाड,नांदगाव,येवला येथील वनविभागाचे कर्मचारी ,नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. वनविभागाने घेतलेले ड्रोन मधील काही दृष्य खास प्रेक्षकांसाठी