अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील बागलाण पट्ट्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे बागलाण मधील महत्त्वाचे असलेले हरणबारी धरण काल रात्री ९ वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मोसम नदीला मोठा पूर आला आहे. धरणातून ३६८९ क्यूसेक्स इतके पाण्याचा विसर्ग मोसम नदी पात्रात होत असल्याने मोसम खोऱ्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय हरणबारी यंदा लवकर भरून वाहू लागल्याने परिसरातील नागरिकांनी,शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.