अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
गुजरात राज्यातील आहवा डांग जिल्ह्यातील सापुतारा -वघई माळेगांव घाटात दरड कोसळल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक ते सुरत या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासुन संततधार मुसळधार पावसामुळे सापुतारा घाटात दरड कोसळून लहान मोठी झाडे, झुडपे,दगड, माती रस्तावर आल्याने, नाशिक-सुरत राज्य महामार्ग वरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहनाच्या रांगा रस्त्यावर लागल्या होत्या. नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाकडुन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम चालू आहे. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. यामुळे काही वाहने मोठीचागावठा, तळपाडा या मार्गावरून सुरगाणा मार्गे नाशिक कडे जात होती. श्री भुवन ते जामनेमाळ रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने हट्टी मार्गे जाता येते नव्हते. यामुळे मालवाहतूक खोळंबली असून भाजीपाला,व इतर कंपन्यांच्या मालाचे मोठं नुकसान होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.