तिरुमला – आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात भगवान वेंकटेश्वरचे तर तिरुमला हे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचा दावा तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) केला आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी प्रासंगिक आणि ऐतिहासिक पुरावे सादर करणार असल्याचेही तिरुमला तिरुपती देवस्थानमने म्हटले आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ असल्याची मान्यता आहे. मात्र, तिरुमला देवस्थानमने हा नवा दावा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
अंजनाद्री हा पर्वत तिरुमलाच्या सात पर्वतांपैकी एक असून तेच भगवान हनुमानाचे जन्मस्थळ आहे, हे सिद्ध करण्यासाठी मंदिर प्रशासन, टीटीडी, उगादी उत्सवाच्या दिवशी (तेलुगू नवीन वर्ष) १३ एप्रिललला याबाबत एक पुस्तिका प्रकाशित करण्यासही तयार आहे.
पूर्वेकडील शेषचलम पर्वतरांगेती ल तिरुमलाच्या सात पर्वतांपैकी एक असलेल्या अंजनाद्री येथे भगवान हनुमानाचा जन्म झाला होता. हे सिद्ध करण्यासाठी आम्ही समितीचा अहवाल एका पुस्तिकेमध्ये प्रसिद्ध करणार आहोत, असे टीटीडीचे कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी यांनी स्पष्ट केले.










