इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अनेकदा असे काही व्हिडिओ सोशल मीडियावर येतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका सलूनचा आहे. यामध्ये एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली आहे. यानंतर सलून चालक हेअर ड्रेसर घेऊन येतो आणि तो केसांवर वापरू लागतो. त्याचक्षणी अचानक मोठा आवाज होतो आणि हेअर ड्रायरला आग लागते. हे पाहून सलून चालक हेअर ड्रायर सोडून पळून गेला आणि बघता बघता संपूर्ण दुकानात आग आणि धूर पसरला.
मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशमध्ये या वर्षी जुलै महिन्यात ही घटना घडली होती. मात्र त्याचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वोसा टीव्हीच्या ट्विटर हँडलवर उपलब्ध माहितीनुसार, ही घटना कच्छापूरच्या नारायणगंज भागातील आहे. यानुसार ग्राहक आणि सलून चालक हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
जरी ही घटना थोडी जुनी आहे, परंतु तरीही हेअर ड्रायर वापरकर्त्यांसाठी धडा असू शकते. हेअर ड्रायरला आग कशी लागली हे स्पष्ट झालेले नाही. एसी गॅस लिक झाल्यामुळे आग लागल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. त्याचवेळी, काही लोकांचे म्हणणे आहे की, सलून चालकाने ग्राहकाच्या डोक्यावर लावलेल्या द्रवाने हेअर ड्रायरला आग लागली.
https://twitter.com/vosatvofficial/status/1568565812327227393?s=20&t=aJeK_o3BUmJQ6D-6kzzFpA
Hair Dryer Blast in Salon Shocking Video Viral