इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समोशांमध्ये गोमांस विकल्याची घटना सूरत पाठोपाठ नवसारीमध्ये उघड झाली आहे. पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. याआधी सुरतमध्ये समोशामध्ये गोमांस विकल्याची घटना समोर आली होती.
नवसारीच्या जलालपूर तालुक्यातील दाबेल गावात गोमांसाची विक्री गोरक्षक आणि पोलिसांच्या छाप्यात उघडकीस आली. गोरक्षकांच्या आरोपावरून पोलिसांनी समोशामध्ये सापडलेला गोमांसाचा तुकडा तपासासाठी पाठवला होता. एफएसएल चाचणीत समोशामध्ये गोमांस असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या तपासानुसार, या दुकानात पूर्वी समोशांमध्ये भरलेले चिकन आणि बकरीचे मांस विकले जात होते. गोमांस असलेले समोसे कधीपासून विकत होता, याची पोलीस चौकशी करत आहेत. पोलिसांनी अहमद मोहम्मद सुजला अटक केली आहे. पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोटगाडीवर गोमांसाचे समोसे सापडले होते, त्याचे नाव ए-वन चिकन बिर्याणी असे आहे. ए-वन चिकन बिर्याणी या गाडीवर गेल्या चार वर्षांपासून व्यवसाय सुरू होता. या लोटगाडीमध्ये कोंबडी आणि बकरीच्या मांसासोबत बीफ समोसेही बनवले जात होते.
नवसारी जिल्ह्यातील जलालपूर तालुक्यातील दाबेल गावात गोमांस समोसा विकल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी ए-वन चिकन बिर्याणी लॉरीतील समोशांचे नमुने एफएसएल चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. समोशांमध्ये गोमांस असल्याचे लॅबच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मांस पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीचा पोलिसांनी शोध घेतला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Gujrat Samosa Beef Sale Surat Navsari