इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणताही विश्वविक्रम करणे सोपे नसते. करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, परंतु विश्वविक्रम हा असा छंद असतो, जो जिंकण्यासाठी एखादा मनुष्य काहीही करण्यास तयार असतो. अशीच एक अनोखी गोष्ट करून एका व्यक्तीने विश्वविक्रम केला आहे. एखाद्या व्यक्तीची इच्छा शक्ती असेल, तर जगात काहीही पराक्रम किंवा विक्रम करू शकतो. त्याच्या इच्छाशक्ती पुढे कोणताही शारीरिक कमकुवतपणा आड येऊ शकत नाही. असे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. आता प्रश्न असा आहे की, कोणी 10 सेकंदात एक लिटर सोडा पिऊ शकता का? प्रश्न थोडा विचित्र आहे, पण एका व्यक्तीने ते खरोखरच केले आहे.
एका व्यक्तीने अवघ्या काही सेकंदात एक लिटर सोडा पिऊन विश्वविक्रम केला आहे. विश्वविक्रमाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. साधारणपणे 1 लिटर पाणी पिण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतात. पण सोडा कडू असेल तर उशीर होऊ शकतो, परंतु या व्यक्तीसाठी हा जणू एक खेळ आहे. 1 लिटर सोडा प्यायल्यानंतरही त्या व्यक्तीला काहीच झाले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने अवघ्या काही सेकंदात न थांबता 1 लिटर सोडा वॉटर प्यायल्याचे दिसून येते. यासह या व्यक्तीने 6.08 सेकंदात सोडा पिऊन विश्वविक्रम मोडला आणि एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. ही व्यक्ती अमेरिकेतील प्रसिद्ध YouTuber आहे. एरिक ‘बॅडलँड्स’ बुकर असे त्याचे नाव आहे. ती फूड ब्लॉगर आहे. अलीकडेच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
Guiness World Record Man Drink 1 Litre Soda within 6 Second video