गुरूवार, नोव्हेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अंतर्नाद, महावादन, महारांगोळी, शस्त्र प्रदर्शन, शस्त्र कलांचे सादरीकरण… गुढीपाडव्यानिमित्त नाशकात भरगच्च कार्यक्रम

मार्च 7, 2023 | 5:15 am
in इतर
0
IMG 20230306 WA0021 e1678118220125

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थातच गुढीपाडवा, भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते.ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते.

म्हणूनच गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक पद्धतीनेच करण्यासाठी दरवर्षी या नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात येते.
राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक यांच्या तर्फे या हिंदू नववर्षाचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात आणि शोभा यात्रांच्या जल्लोषात साजरा करण्याची हि आपली परंपरा आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी ‘पाडवा पटांगणावर’ गुढीपाडव्याच्या एक आठवडा आधीपासून संस्कृती जपणारे विविध सामुहिक कार्यक्रम घेण्यात येतात. कार्यक्रमाचे उददेश हे आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा असतो. कार्यक्रमाचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता जनजाती पुनरुत्थान इत्यादी राहिलेले आहेत. यंदाच्या वर्षी “पर्यावरण रक्षण” हा विषय घेऊन राष्ट्रीय विकास मंडळ संचलित, नववर्ष स्वागत यात्रा समिती व नाशिक महानगर पालिका हि सज्ज झाली आहे.

त्या अनुषंगाने, शनिवार १८ मार्च २०२३ रोजी “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील सर्व ढोल पथकांचे एकत्रित ‘महावादन’ (१००० ढोलांचे समूह वादन, सायंकाळी ६ वाजता), छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण,

रविवार १९ मार्च २०२३ रोजी ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ यांना समर्पित “अंतर्नाद” (१५०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन कलेचे सादरीकरण, सायंकाळी ६ वाजता),
सोमवार २० मार्च २०२३ रोजी ‘पर्यावरण रक्षण या अंतर्गत ‘पंचमहाभूते’ या विषयाला अनुसरून “महारांगोळी” (२५००० स्क़्वे.फ फुट रांगोळी, सकाळी ६ वाजेपासून),

मंगळवार २१ मार्च २०२३ रोजी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन’ म्हणजेच ‘मृत्यंजय दिनानिमित्त’ तरुणांमध्ये स्वत्व जागरण करण्याच्या हेतूने ‘शिवकालीन शस्त्रविदया व त्याच बरोबर भारतीय व्यायाम पद्धती’ ज्यामध्ये सूर्यनमस्कार, चंद्र नमस्कार, भूमिवंदन असे विविध ‘भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके’ (सायंकाळी ६ वा.) सादर केली जाणार आहे, तसेच ‘शिवकालीन विविध प्रकारचे शस्त्रे’ आबालवृद्धांना जवळून बघता यावी व हाताळता यावी या उद्देशाने ‘शस्त्रात्रांची प्रदर्शनी’ (सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत) मांडणार आहोत. हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलाचे श्री. लखन जाधव गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी दाखवणार आहेत.

बुधवार २२ मार्च २०२३ रोजी शहरातल्या विविध भागातून सकाळी ७ वाजता शोभा यात्रा होणार असून, पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी , नाशिक याठिकाणी हे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
याकरिता महावादनातील सर्व सहभागी वादक, अंतर्नाद मधील सर्व गुरु व सर्व शिष्य आणि त्यांचे पालक, महारांगोळी च्या सर्व सहभागी महिला व स्वयंसेवक यांचा सराव मोठ्या उत्साहात सुरु आहे.

अंतर्नाद, महावादन व महारांगोळी या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची पूर्वतयारी पूर्ण होत आली असून यंदाही अधिकाधिक भव्य स्वरुपात या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने नववर्ष स्वागत यात्रा समिती तर्फे शोभायात्रा व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची पूर्वतयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. यंदाही अधिकाधिक भव्य यात्रा काढण्यासाठी आयोजक सरसावले असून बैठका सुरू झाल्या आहेत. तरी हा सण अधिक चांगल्या पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी नाशिककरांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती, नाशिक चे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष राजेश दरगोडे, सचिव योगेश गर्गे व संघटक जयंत गायधनी यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे स्वरूप पुढील प्रमाणे:
महारांगोळी : नाशिक शहराच्या सर्व भागातून व स्तरातून ५०० पेक्षा जास्त महिला एकत्र येऊन सुमारे २५००० चौरस फुट रांगोळी साकारतात त्यासाठी त्याचे रांगोळीचे कौशल विकास प्रशिक्षण राबविले जाते.

महावादन: नाशिक नगरीतील सर्व ढोल पथक एकत्र येऊन महावादन हा सामुहिक ढोल ताशा वादनाचा कार्यक्रम साकारत असतात. ढोलाच्या नादातून मोठ्या प्रमाणात सकारात्मक उर्जा तयार होत असते. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत हे सकारात्मक उर्जेने व्हावे हा उददेश असतो. सदर कार्यक्रमा मध्ये १५०० पेक्षा जास्त वादक सहभागी असतात. तरुण तरुणीमध्ये या कार्यक्रमाचे प्रचंड आकर्षण आहे व सहभागही लक्षणीय आहे.

अंतर्नाद : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या विविध वाद्यांचे वादक, गायक व नृत्य कलाकार असे १५०० पेक्षा जास्त कलाकार एकत्र येऊन सामुहिकरित्या अंतर्नाद हा कार्यक्रम सादर करतात. या सर्व कार्यक्रमांना रसिक नाशिककर नागरिक मोठया प्रमाणात उपस्थिीत राहून कार्यक्रमाचा आनंद घेतात..

शस्त्रविदया प्रदर्शन : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणजेच मृत्यंजय दिनानिमित्त शिवकालीन शस्त्रविदया व भारतीय व्यायाम आणि प्रात्याक्षिके सादर केली जाणार आहे तसेच शिवकालीन शस्त्रात्रांची प्रदर्शनी मांडणार आहोत.

स्वागत यात्रा : गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी मेनरोड, रविवार कारंजा, रविवार पेठ, महात्मा गांधी रोड या परिसरातून तसेच काळाराम मंदिर परिसरातून ते पंचवटीतील प्रमुख रस्त्यांवरून पारंपारिक वेशभूषेत शोभायात्रा काढली जाते. यात लेझीम पथक, चित्ररथ, ढोल पथक, मल्लखांब, महिला बाईक सफारी, मंगळागौरीचे खेळ व मर्दानी खेळ चे पथक असते.

Gudhipadva Various Cultural Programs in Nashik

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मलाही लैंगिक शोषणाला तोंड द्यावे लागले’, अभिनेता पियुष मिश्रांनी सांगितला धक्कादायक अनुभव

Next Post

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल इतक्या लाख नागरिकांचे आधार अपडेटच नाही

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
30 09 2020 aadhaar card 20813290

अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल इतक्या लाख नागरिकांचे आधार अपडेटच नाही

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011