पिंपळगाव बसवंत: गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरात पुन्हा कोरोनाने थैमान घातले आहे. शहरात कोरोनाची दुसरी लाट सुपर स्प्रेडर ठरत असल्याने पिंपळगाव बसवंत शहरात २१ एप्रिलपासून ते ३० एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला असला तरी शहरात वाढती रुग्णसंख्या बघता येथील किराणा कटलरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील १९ पासून ते ३० तारखेपर्यंत तब्बल १२ दिवस किराणा मालाची दुकाने स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरात कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन पुरते धास्तावले आहे.वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून कडक निर्बंध लादण्यात आले असताना देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने पिंपळगाव बसवंत शहरात सर्वपक्षीय बैठकीत झालेल्या निर्णयाअंती ३० तारखेपर्यंत १० दिवस कडक जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून व रुग्णसंख्या आटोक्यात यावी यासाठी पिंपळगाव बसवंत शहर किराणा, कटलरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने देखील शहरातील किराणा कटलरी मालाची दुकाने १९ एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
…..
स्वयंस्फूर्तीने निर्णय