विशेष प्रतिनिधी, मुंबई
सध्याच्या काळात प्रत्येक तरुण नोकरी शोधत असतो, अशा परिस्थितीत विविध सरकारी विभागांमध्ये नोकर भरती अधिसूचना जारी केली आहे. थोड्या जिद्दीने अभ्यास केला, तर सरकारी नोकरी मिळू शकेल. नोकरीची योग्य संधी शोधणे महत्त्वाचे आहे. परंतु सरकारी नोकरीची सुवर्ण संधी कोठे, केव्हा आहे, हे जाणून घेऊ या…
१) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
डीएफसीसीआयएल अधिकृत संकेतस्थळावर एक अधिसूचना जारी केली आहे. एकूण १०७४ पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. भरती प्रक्रियेद्वारे कार्यकारी, कनिष्ठ कार्यकारी आणि कनिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी अर्जदारांची भरती होईल. २४ एप्रिलपासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार डीएफसीसीआयएल https://dfccil.com/ च्या अधिकृत वेबसाइटवर २३ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
२) ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड
ओएमसी लिमिटेड यांनी कार्यकारी पदांच्या भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे. भरती प्रक्रियेद्वारे अर्जदारांना उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी भरती केली जाईल. इच्छुक उमेदवार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ मे निश्चित करण्यात आली आहे.
पदे अशी – उपव्यवस्थापक (कार्मिक) – ३ पदे, उपव्यवस्थापक (वित्त) – ३ पदे, व्यवस्थापक वन आणि पर्यावरण – २ पदे, वैद्यकीय अधिकारी – २ पदे, उपमहाव्यवस्थापक (खाण) – १ पद, वरिष्ठ व्यवस्थापक (खाण) – १ पद, उपमहाव्यवस्थापक (कायदेशीर) – १ पद
३) ईस्टर्न कोल लिमिटेड
ईस्टर्न कोल लिमिटेडने विविध पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ७५ पदे आहेत. अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांच्या ५१, वैद्यकीय तज्ज्ञांच्या २२ आणि वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी २१ पदांसाठी अर्जदारांची नेमणूक केली जाईल. इच्छुक उमेदवार ईसीएलच्या www.easterncoal.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
४) केरळ पोस्टल सर्कल
भारतीय पोस्ट विभागाने केरळ पोस्टल सर्कलमध्ये २७ भागात १४२१ पदांसाठी भरती सुरू केली आहे. ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) च्या विविध पदांवर अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, कॅलिकट, कन्नूर, कासारगोड, मांजरी, ओट्टापळम, पालघाट, थॅलेसेरी, तिरुर, वडकर, अलेप्पे, अल्वे, चंकेरी, एर्नाकुलम, इडुक्की, इरिंजालकुडा, कोट्टयम, मावेलिकरा, तिरु बलुरूमार्गे भरती प्रक्रिया – त्रिवेंद्रम उत्तर आणि त्रिवेंद्रम दक्षिण तसेच लक्षद्वीप केंद्र शासित प्रदेशात एकूण १४२१ रिक्त जागा नियुक्त करण्यात येतील.
५) भारतीय लष्कर
भारतीय सैन्याने दंत वाहिनीमध्ये ‘शॉर्ट सर्व्हिस कमिशन २०२१’ प्राप्त अधिका-यांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सैन्य दंत चिकित्सक विभागाच्या एकूण ३७ पदांवर भरती होईल. अर्ज करू इच्छित उमेदवार भारतीय सैन्य भर्ती पोर्टल, joinindianarmy.nic.in वर दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवार १८ मे पर्यंत अर्ज करू शकतात.ॉ
६) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल)ने २६८ पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, भरती प्रक्रियेच्या माध्यमातून देशभरातील प्रांतांमध्ये पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, आसाम, दिल्ली आणि मध्य प्रदेशमधील विविध पदांसाठी अर्जदारांची नेमणूक केली जाईल. बीईएलच्या विभागांमधील या पदांवर भरती : एकूण पोस्ट – २६८ त्यात पंजाब ६४, गुजरात ३६, उत्तर प्रदेश ४८, जम्मू आणि काश्मीर ४८, राजस्थान २४, आसाम २४, दिल्ली १२, मध्य प्रदेश १२ पदांचा समावेश आहे.
९) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
सेल ने झारखंड, ओडिशा आणि मध्य प्रदेशात असलेल्या विविध खाण संकुलांमध्ये कार्यरत असलेल्या रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमधील ४६ पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. अधिकृत संकेतस्थळावर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी (डेंटल), वैद्यकीय अधिकारी (ओएचएस), वैद्यकीय अधिकारी (जीडीएमओ) आणि विविध क्षेत्रातील वैद्यकीय तज्ञांची पदे भरती करण्यात येतील. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार सेलच्या अधिकृत वेबसाइट sailcareers.com वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.