नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज एक दिवसाच्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांचे ओझर विमानतळ येथे आगमन झाले . विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत पलकुंडवर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, दिंडोरी प्रांत अधिकारी संदीप आहेर, निफाड प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार प्रशांत पाटील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरातील भोसला मिलिटरी स्कूलचा आज ८५वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त स्कूलमध्ये विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे राज्यपाल हे प्रमुख पाहुणे आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खासकरुन विविध सिग्नल आणि चौकामध्ये पोलिसांचा खडा पहारा आहे.
https://twitter.com/maha_governor/status/1565232433099726848?s=20&t=XP3DMlE9K6bc2tNTrou35g
Governor Bhagat Singh Koshyari Nashik Visit Today