सोमवार, सप्टेंबर 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी तयार? भाजप आणि शिंदे गटाकडून कुणाला मिळणार संधी?

by Gautam Sancheti
ऑगस्ट 19, 2022 | 1:39 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Eknath Shinde Devendra Fadanvis e1660037599940

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी विशेष चर्चेची ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारने दिलेली आमदारांची यादी राज्यपालांनी शेवटपर्यंत मंजूर केली नाही. आता राज्यात सत्ता बदल झाला असून भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आता आमदारांची यादी परत मागविली आहे. त्यानुसार, नवीन यादी देणार असल्याचे शिंदे–फडणवीस सरकारने स्पष्ट केले आहे. या नियुक्त्यांमध्ये भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ३ आमदार होणार असल्याचे सांगितले जात आहे. या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे बोलले जाते. मात्र, याच कुणाला संधी मिळते हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. शिंदे – फडणवीस यांचे नवे सरकार आले. यातच आता महाविकास आघाडी सरकारने पाठवलेली राज्यपालनियुक्त आमदारांची यादी रद्द करण्यात येणार असून, नव्या शिंदे – फडणवीस सरकारने नवी यादी तयार केल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिंदे गटाकडे ४० आमदार असल्याने त्यांचे संख्याबळ हे भाजपपेक्षा एक तृतीयांश आहे. मात्र तरीही त्यांना मंत्रिमंडळात १८ पदे मिळणार असल्याचे सांगितले जाते. यातील दोन ते तीन पदे ही अपेक्षांना देण्यात येणार असल्याने त्यांच्या गटाला १५ मंत्रिपदे मिळतील अशीही चर्चा आहे. हेच प्रमाण महामंडळे व राज्यपालनियुक्त आमदारांमध्येही लावले गेले असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची स्वप्ने पडत आहे. पुढील विस्तारात स्वतःचा समावेश करुन घेण्याची अनेकांना घाई झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करणे हे शिंदे गटाला मिळणाऱ्या सत्तेतील वाट्यात सगळ्यात मोठा अडसर ठरत असल्याचेही बोलले जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्रीपद जरी एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी विधानसभा अध्यक्षपदासह मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवत भाजपने सरकारमधील आपले वर्तस्व सिद्ध केलं आहे. या घडामोडींमुळे आधीच बॅकफूटवर गेलेल्या महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्यासाठी भाजप नेतृत्वाकडून व्यूहरचना आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटात अनेकांनी मंत्रीपदासाठी गुडघ्याला बांशिंग बांधले. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच आता राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिंदे यांचे कसब पणाला लागणार आहे. कारण आमदार होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यातून कुणाला संधी द्यायची आणि जे नाराज होतील त्यांना कसे सांभाळायचे असे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. अत्यंत विश्वासू आणि निष्ठावान नेत्याला संधी देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते. शिंदे यांनी ज्या नेत्यांना जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख अशी जबाबदारी दिली आहे त्याच नेत्यांची आमदारपदी वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Governor Appointed MLA List BJP Shinde Group
Maharashtra Politics Eknath Shinde Bhagat Singh Koshyari Assembly MLC

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अभिनेत्री सोमी अलीने अभिनेता सलमान खानवर केले हे गंभीर आरोप

Next Post

विविध आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी केला हा खुलासा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

modi 111
महत्त्वाच्या बातम्या

आजपासून नवीन जीएसटी, आता केवळ ५ टक्के आणि १८ टक्के कर स्लॅब असतील: पंतप्रधान

सप्टेंबर 22, 2025
Untitled 30
मुख्य बातमी

आज आहे घटस्थापना; असे आहे नवरात्रोत्सवाचे महात्म्य…नऊ दिवस कोणते कपडे घालावे

सप्टेंबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना नव्या संधीचे दालन खुले होईल, जाणून घ्या, सोमवार, २२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 21, 2025
IMG 20250921 WA0434 1
स्थानिक बातम्या

संयुक्त राष्ट्र महासभेच्या UNGA80 विज्ञान शिखर परिषदेत एसएनजेबी अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले देशाचे प्रतिनिधित्व

सप्टेंबर 21, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला फसवणुकीच्या प्रकरणात सुनावली ४ वर्षांची शिक्षा…

सप्टेंबर 21, 2025
bullete train
महत्त्वाच्या बातम्या

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केव्हा पूर्ण होणार? रेल्वेमंत्र्यांनी दिली ही माहिती

सप्टेंबर 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1
संमिश्र वार्ता

या जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ६८९ कोटी रुपयांचा निधी…

सप्टेंबर 21, 2025
Government of India logo
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय शिष्टमंडळ या तारखेला अमेरिकेला भेट देणार…या विषयांवर चर्चा

सप्टेंबर 21, 2025
Next Post
sanjay raut5 e1659349042580

विविध आरोपांवर खासदार संजय राऊत यांनी केला हा खुलासा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011