पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवोदय विद्यालय समितीमार्फत बाराशेपेक्षा जास्त नॉन टीचिंग स्टाफची भरती करण्यात येणार आहे. समितीकडून नुकतीच या भरतीविषयीची माहिती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट कमिश्नर, नर्स, ऑडिट असिस्टंट, स्टेनोग्राफर अशा अनेक पदांचा त्यात समावेश आहे.
भारत सरकारने १९८६च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरू केली आहेत. भारत सरकारच्या संपूर्ण आर्थिक साहाय्याने नवोदय विद्यालय समिती या स्वायत्त संत्रणेमार्फत मुला-मुलींसाठी निवासी जवाहर नवोदय विद्यालये सुरू करण्यात आली आहेत. या शाळांमध्ये दरवर्षी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असते. सध्या नुकतीच त्याविषयीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून, दहावी, बारावी, डिग्री, डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींना यातून नोकरीची संधी मिळू शकणार आहे.
१८ ते ४५ वयोगटातील पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार असून, ९ ते ११ मार्चदरम्यान या पदांसाठी परीक्षा घेतल्या जाणार आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच करायचे असून, navodaya.gov.in या वेबसाइटवर या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. १९ हजार ९०० ते २ लाख ९ हजार २०० दरम्यान वेतनप्रणाली या पदांसाठी निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत नोकरी शोधणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे, अशांसाठी नवोदय विद्यालयातील ही भरती मदतीची ठरू शकणार आहे.
या पदांसाठी आहे भरती
असिस्टंट कमिश्नर – ५ पद · असिस्टंट कमिश्नर (एडमिन) – ५ पद · महिला स्टाफ नर्स – ८२ पद · असिस्टंट सेक्शन ऑफिसर – १० पद · ऑडिट असिस्टंट – ११ पद · ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर – ४ पद · ज्युनियर इंजीनियर (सिविल) – १ पद · स्टेनोग्राफर – २२ पद · कॉम्प्यूटर ऑपरेटर – ४ पद · कॅटरिंग असिस्टेंट – ८७ पद · ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (आरओ कैडर) – ८ पद · ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (जेएनवी कैडर) – ६२२ पद · इलेक्ट्रिशियन कम प्लंबर – २७३ पद · लैब अटेंडेंट – १४२ पद · मेस हेल्पर – ६२९ पद · एमटीएस – २३ पद