मुंबई – माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची प्रगती झाल्यानंतर जगातील कोट्यवधी युजर्सना त्याचे जितके फायदे झाले आहेत, तितकेच नुकसानही झाले आहे. सर्वच क्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे दाखल झाली असून, त्याला हे क्षेत्रसुद्धा अपवाद नाही. हॅकर्सकडून हल्ले करून अनेक साइट्स हॅक केल्या जातात आणि युजर्सची संसवेदनशील खासगी माहिती चोरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर साइट्स वेगवेगळे अपडेटही जारी करतात. जेणेकरून युजर्सना त्यापासून सुरक्षित ठेवता येईल. प्रसिद्ध इंटरनेट ब्राउझर गुगल क्रोमबाबतही गुगलने आपल्या युजर्सना यासंदर्भात इशारा दिला आहे.
गुगलने आपल्या दोन अब्ज क्रोम युजर्सना इशारा दिला आहे. गुगल क्रोम ब्राउझरवर वेगाने हल्ले वाढू लागले आहेत. तसेच अनेकांचे ब्राउझर हॅक होण्यास पुष्टीही मिळाली आहे. गेल्या दोन आठवड्यात २५ नव्या जोखमांचा शोध लावण्यात आला आहे. त्यापैकी सात जोखीम उच्च स्तरावरील धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. या धोक्यामुळे लाइनक्स, मॅकओएस आणि विंडोज या सर्वांचे युजर्स प्रभावित झाले आहेत. या प्रकरणांमध्ये त्वरित सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असा खुलासा गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये केला आहे.
फोर्ब्सच्या वृत्तानुसार, गुगल सध्या क्रोम युजर्सना अपग्रेड करण्यासाठी हॅकिंगसंदर्भात माहिती देत आहे. परिणामी नव्या उच्चस्तरीय धोके पाहता पुढे मार्गक्रमण करताना सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. नव्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर गुगलने क्रोमसाठी नवे अपडेट ९६.०.४६६४.४५ प्रसिद्ध केले आहे. आगामी काही आठवड्यात हे अपडेट लागू होईल असे गुगलने म्हटले आहे. याचा अर्थ असा होतो की क्रोम वापरताना तुम्ही आता लगेच सक्षम होऊ शकणार नाही.
आपली सुरक्षा तपासण्यासाठी सेटिंगमधील सहाय्यतामध्ये जावे. तिथे गुगल क्रोममध्ये नेव्हिगेट करावे. जर तुमचा क्रोम ब्राउझर ९६.०.४६६४.४५ किंवा उच्चस्तरावर सूचिबद्ध असेल तर तुम्ही सुरक्षित आहात असे समजावे. जर ब्राउझरमध्ये अद्याप अपडेट उपलब्ध झाले नसेल तर तुम्ही नियमितरित्या संस्करणाची तपासणी करत राहा.
अपडेट केल्यानंतर सुरक्षित राहण्यासाठी ब्राउझर पुन्हा सुरू करावा लागेल. याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. उच्चस्तरीय हल्ले झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरितच गुगलकडून त्यावर उपाययोजना केल्या जातात. अपडेट केल्याच्यानंतर ब्राउझर पुन्हा सुरू केले तरच ते प्रभावीपणे लागू होऊ शकते.