नवी दिल्ली – युजर्सच्या डाटाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने लॉगिनमध्ये बदल करण्याच्या घोषणेची अंमलबजावणी गुगलतर्फे सुरू करण्यात आली आहे. ९ नोव्हेंबरपासून सर्व गुगल अकाउंट युजर्सना लॉगिन करताना टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. गुगलमधील हा सर्वात मोठा बदल असून, युजर्सच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
गुगलतर्फे या वर्षीच्या सुरुवातीला अपडेटची घोषणा करण्यात आली होती. २०२१ च्या अखेरपर्यंत आम्ही 2SV मध्ये अतिरिक्त १५० कोटी युजर्सना ऑटोनामांकित बनविण्याची योजना तयार करत आहोत. ही योजना सुरू करण्यासाठी २ कोटी यूट्यूब क्रिएटर्सची आवश्यकता आहे, असे गुगलने ब्लॉकपोस्टमध्ये म्हटले होते.
टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रिया मूळ स्वरूपात सर्व अकाउंटधारकांसाठी अतिरिक्त सुरक्षा कवच प्रदान करते. एकदा पर्याय इनेबल झाल्यानंतर अकाउंटमध्ये लॉगिन करताना युजर्सना एसएमएस अथवा ईमेलद्वारे एक ओटीपी मिळेल. वन टाइम पासवर्डची नोंद केल्यानंतरच युजर्स अकाउंटमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. प्रत्येक वेळी अकाउंटमध्ये प्रवेश करताना या प्रक्रियेतून जावे लागेल. युजर्सच्या अकाउंटच्या सुरक्षेची एक अतिरिक्त लेयर जोडली जाणार आहे. यामुळे युजर्सचा खासगी डाटा सुरक्षित राहील.
गुगलतर्फे टू स्टेप व्हेरिफिकेशनला सक्षम बनविण्यासाठी सर्व युजर्सना ईमेल आणि इन अॅप अलर्ट पाठविला जात आहे. व्हेरिफिकेशन प्रक्रिया इनेबल नसेल तर ९ नोव्हेंबरला ती स्वयंचलितरित्या अॅक्टिव्ह होईल. पासवर्ड नोंदविल्यानंतर युजर्सना फोनवर दुसरा टप्पा पूर्ण करावा लागेल. लॉगिन करताना युजर्सनी फोन स्वतःजवळ बाळगावा. हे फिचर युजर्स अॅक्टिव्ह करू शकतील.
टू स्टेप व्हेरिफिकेशनला असे करा इनेबल
स्टेप १ – आपले गुगल अकाउंट उघडा
स्टेप २ – नेव्हिगेशन पॅनलमध्ये सुरक्षा निवडा
स्टेप ३ – गुगलमध्ये साइन इन करण्याच्या पर्यायांतर्गत टू स्टेप व्हेरिफिकेशन निवडा
स्टेप ४ – ऑन स्क्रीन स्टेप्सचे पालन करा.