रविवार, ऑक्टोबर 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

गुगलने भारतासाठी केल्या या घोषणा; येत्या काळात मिळणार या सुविधा

यूट्यूब शॉर्ट्स लाँच: आता अॅप वापरकर्ते ६० सेकंदांचा व्हिडिओ तयार करू शकतात

नोव्हेंबर 18, 2021 | 3:24 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
google for india

मुंबई – गुगल फॉर इंडिया २०२१ हा इव्हेंट नुकताच संपला असून या कार्यक्रमात यूट्यूब शॉर्ट्स लाँच करण्यात आले आहे. तसेच गुगल क्लासरूममध्ये नवीन फीचर्स जोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होईल. याशिवाय गुगल करिअर प्रमाणपत्रही जाहीर करण्यात आले आहे. भारतासाठी Google ची 7 वी आवृत्ती सुरू झाली आहे. हा कार्यक्रम गुगलच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येईल.

गुगल फॉर इंडिया २०२१ इव्हेंटचे हायलाइट्स असे
१) गुगलने डिजिटल प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याची फी ६ हजार ते ८ हजार रुपयांपर्यंत आहे. यासाठी गुगलने नॅसकॉम फाउंडेशन आणि टेक महिंद्रा यांच्यासोबत शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू केला आहे.

२) गुगलचे एक लहान व्हिडिओ प्लॅटफॉर्म, भारतात लाँच करण्यात आले आहे. जेथे वापरकर्ते ६० किंवा त्यापेक्षा कमी सेकंदाचे व्हिडिओ बनवू शकतील. यूट्यूब मोबाईलच्या प्लस बटणावर क्लिक करून छोटे व्हिडिओ बनवता येतात. अनेक व्हिडिओ क्लिप येथे मिळतील.

३) गुगल पे ला नवीन माय शॉप (My Shop) वैशिष्ट्य दिले जाईल. त्यावर छोटे दुकानदार गूले पे अॅपवर त्यांची सर्व यादी प्रदर्शित करू शकतील. गुगल पे चे उपाध्यक्ष संजय गुप्ता यांच्या मते, या अॅपद्वारे दरवर्षी सुमारे १५ अब्ज डिजिटल व्यवहार केले जात आहेत. ग्रुप पेमेंट वैशिष्ट्य लवकरच गुगलद्वारे लाँच केले जाईल. म्हणजे समूहातील अनेक लोक पेमेंट करू शकतील. Google 2022 मध्ये Google Pay मध्ये हिंदी आणि इंग्लिश भाषेला सपोर्ट करेल. असे करणारे Google हे पहिले UPI पेमेंट प्लॅटफॉर्म असेल.

४) गुगलचे उत्पादन व्यवस्थापक नोफर पेलेड लेवी यांच्या मते, Google सतत जलद गतीने हवामान बदल आणि हवामान ऑपडेट माहीत करण्यासाठी कार्य करत आहे. तसेच मागील वेळेच्या घटनांची माहिती दिली जात आहे. Google च्या IMD अपडेटनुसार, ग्राहकांच्या फोनवर पूरसारख्या घटनांचे अलर्ट पाठवले जात आहेत. पूर ही भारतातील मोठी समस्या आहे, ती टाळण्यासाठी गुगल हे सरकारसह नागरिकांना मदत करत आहे.

५) गुगल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) रिसर्च लॅब ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य सुविधा पुरवत आहे. यासाठी गुगलने मित्र कार्यक्रम फॉर सोशल गुड्स प्रोग्राम सुरू केला असून त्याअंतर्गत आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलांना मदत करतात. तसेच त्यांचे डेटा संकलनाचे काम. गुगलहा भारतीय नागरिकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे जटिल काम सोपे होत आहे. त्यासाठी AI हे एक उत्तम साधन आहे. तसेच त्यामुळे पर्यावरणासोबत आरोग्य सुधारण्यास मदत होत आहे. यासाठी 2019 मध्ये गुगलने AI रिसर्च लॅब तयार केली.

६) डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी Google Classroom नवीन वैशिष्ट्यांसह जोडले जात आहे. त्याद्वारे विद्यार्थी अभ्यास साहित्य डाउनलोड करू शकतील. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम फीचर आता गुगल सर्चमध्ये सपोर्ट केला जाईल. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची समस्या गुगलवर सहज शोधता येईल. यासोबतच मोफत शिकण्याचे अभ्यासक्रमही वाढवले ​​जात आहेत.

७) महागड्या स्मार्टफोनमुळे ५० टक्के वापरकर्ते इंटरनेटचा वापर करू शकले नाहीत. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्याला इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी, Google ने Jio सोबत भागीदारी करून सर्व भारतीयांना इंटरनेटशी जोडण्याचे पहिले पाऊल उचलले आहे. त्यामुळे अॅप वापरकर्त्यांना स्वस्त आणि सुरक्षित JioPhone Next स्मार्टफोन कमी किंमतीत मिळू शकेल. यासाठी गुगलने खास भारतीयांसाठी PragatiOS तयार केले आहे.

८) प्रभाकर राघवन म्हणाले की, Google भारतात इंटरनेट शक्य तितके सोपे बनवण्याच्या दिशेने काम करत आहे. जेणेकरून अनेकांना त्याचा लाभ घेता येईल. भारतातील ६० कोटी इंटरनेट वापरकर्त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत इंटरनेट उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोना महामारीच्या काळात, ऑनलाइन स्लॉट बुकिंगपासून ते COVID-19 लसीकरणापर्यंतच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया स्थानिक भाषेत उपलब्ध करून देण्यात आली होती.

९) राजीव चंद्रशेखर यांनी भारताचे डिजिटल इंडिया व्हिजन सादर केले. ते म्हणाले की, देशातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याला आमचे प्राधान्य आहे. यासोबतच नागरिकांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी जोडावे लागेल. ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी आम्ही देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर कायदा लागू करणार आहोत.

१०) गुगल कंपनीने Google करिअर प्रमाणपत्र जाहीर केले आहे, त्या अंतर्गत IT सपोर्ट, डेटा मॅनेजमेंट सारखे अभ्यासक्रम शिकता येतात. यासाठी गुगलकडून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली असून, येत्या दोन वर्षांत सुमारे १ लाख तरुणांना याचा लाभ होणार आहे.

११) गुगलने भारतात १० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. जेणेकरुन ते भारताच्या डिजिटल वाढीचा भागीदार बनू शकेल. ही रक्कम पुढील ५ वर्षांत खर्च करायची आहे. त्याच वेळी, भारत UPI व्यवहारांच्याबाबतीत वेगाने पुढे जात आहे. यामध्ये लहान शहरे आणि गावांमधील नागरिकांही समावेश आहे, जे डिजिटल पद्धतीने पैसे ट्रान्सफर करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात लोक स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवत आहेत.

१२) भारत एक अग्रगण्य डिजिटल अर्थव्यवस्था आहे. सध्याच्या काळात इंटरनेट सर्वत्र आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे देश झपाट्याने प्रगती करत आहे. यामध्ये गुगल महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

गुगलच्या मते, देश चालू आहे. देशातील मुलांना ऑनलाइन उत्तरे मिळत आहेत. ऑनलाइन शिक्षण उपलब्ध आहे. अनेक मुले कोडिंग शिकत आहेत. तसेच रोजगाराच्या दिशेने गुगल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे भारत डिजिटल मार्गावर वेगाने धावत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पहिल्या पत्नीच्या भावाचाही वानखेडेंकडून छळ; मलिक यांचा आणखी एक गंभीर आरोप

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

IMG 20251018 WA0011
महत्त्वाच्या बातम्या

कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोंडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प…

ऑक्टोबर 18, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा दिवस… जाणून घ्या, १९ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 18, 2025
IMG 20251018 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकच्या सामन्यात… महाराष्ट्राचा सौराष्ट्र वर १० गडी राखून दणदणीत विजय…

ऑक्टोबर 18, 2025
tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
electiom

नंदुरबार जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या ५७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011