विशेष प्रतिनिधी, पुणे
इंटरनेटवर सर्फिंग करताना एखादी माहिती जाणून घेण्यासाठी आपण Google Chrome ची मदत घेतो. सर्फिंग करताना अनेक वेळा आपल्याला विचित्र पॉप-अप नोटिफिकेशन येत असतात. ते आपल्या काहीच कामाचे नसतात. नोटिफिकेशनमुळे अनेक जण हैराण झालेले असतात. असे नोटिफिकेशन पुन्हा पुन्हा येणार नाहीत, यासाठी काही उपाय आहेत, ते जाणून घेऊयात.
नोटिफिकेशन असे बंद करा
आपल्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमध्ये गुगर क्रोम सुरू करा. उजव्या बाजूच्या कोपर्यात तीन डॉटवर जाऊन तिथे सेटिंगमध्ये जा. नंतर प्रायव्हसी आणि सिक्युरिटीमध्ये जा. तिथे नोटिफिकेशनवर क्लिक करा, आता टॉगल ऑन करा. याने सर्व वेबसाईटवरून येणार्या नोटिफिकेशन बंद होतील. त्याशिवाय तुम्ही Use quieter messaging फिचरचा वापर करूनही नोटिफिकेशनला ब्लॉक केले जाऊ शकते.
अशी करा वेबसाइट ब्लॉक
कोणत्याही वेबसाइटला ब्लॉक करण्यासाठी ब्लॉक सेक्शनमध्ये जा. तिथे संबंधित वेबसाइटचे नाव टाकून Add वर क्लिक करा. हे करताच वेबसाइट ब्लॉक होईल.
नोटिफिकेशन मिळण्यासाठी…
कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ओपन करा. सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी आणि सेक्युरिटी सेक्शनमध्ये जा. आता पॉप-अप आणि रिडायरेक्टमध्ये जाऊन Allow वर क्लिक करा. एवढे करताच तुम्हाला नोटिफिकेशन पुन्हा मिळू लागतील.
गुगलने या वर्षीच्या सुरुवातीला एक विशेष फिचर लाँच केले होते. या फिचरद्वारे गुगल क्रोम ब्राउझरवर स्क्रिन शेअरिंगदरम्यान नोटिफिकेशनना हाइड केले जाऊ शकते. ही माहिती गुगलने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये जारी केली होती. स्क्रिन शेअरिंग बंद केल्यानंतर त्यादरम्यान आलेले पॉप-अप नोटिफिकेशन डेस्कटॉपवर दिसतील. या फिचरद्वारे पॉप-अप नोटिफिकेशन पूर्णपणे बंद केले जाऊ शकत नाही.