मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात कार्यरत असलेल्या हजारो पोलिसांसाठी एक मोठी गुडन्यूज आहे. शासकीय घरामध्ये राहणाऱ्या पोलिसांना स्वतःचे घर घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. काही महत्त्वाच्या कार्यासाठी पोलीसांना कर्ज देखील उपलब्ध होत नाही. मात्र आता पोलिसांची अडचण लवकरच दूर होणार आहे. कारण याबाबत सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील पोलिसांना शासनाने खुशखबर दिली आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गतच २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने डीजी लोन ही सुविधा बंद केली होती. ती आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. डीजी लोन खात्यासाठी जेवढा निधी आवश्यक होता, तो निधी देण्यात आला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यानुसार आता पोलिसांना २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज खात्यांतर्गतच मिळणार आहे. यापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांना १५ लाखात घर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता ही कर्ज सुविधा सुरु केल्याने, पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डीजी लोन ही महाराष्ट्र पोलीस दलातील एक महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेनुसार कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच सहज 20 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध केलं जाते. संजय पांडे ज्यावेळी महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक होते, त्यावेळी ठाकरे सरकारने ही योजना थांबवली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्र्यांचा कारभार आल्यानंतर त्यांनी या योजनेची पुन्हा माहिती घेऊन ती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं महाराष्ट्र पोलिसांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गतच २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याआधी ठाकरे सरकारनं ही योजना बंद केली होती. फडणवीसांनी मात्र ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील पोलीस दलासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
Good News for Maharashtra Police Again get Facility
20 Lakh Loan