इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विमान प्रवासी तस्करीसाठी कधी काय प्रयोग करतील याचा नेम नाही. आताही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँकॉकहून बेंगळुरूला पोहोचलेल्या एका प्रवाशाने चक्क त्याच्या चप्पलमध्ये सोने लपवले होते. मात्र, तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी अतिशय शिताफीने त्याला पकडले आहे.
सीमा शुल्क विभाग देशातील विमानतळांवरून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि सोने जप्त करत असते. याच अधिकाऱ्यांच्या गळाला एक प्रवासी लागला आहे. इंडिगोच्या विमानाने एक प्रवासी बँकॉकहून बंगळुरूला पोहोचला. या प्रवाशाकडे सोने असल्याची शंका अधिकारी व कर्मचाऱ्यांना आली. त्यामुळे या प्रवाशाची कसून चौकशी करण्यात आली. पण, फायदा झाला नाही. अखेर या प्रवाशाची चपले अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. सुरक्षा मशिनमध्ये या चपला स्कॅन केले असता मशिनने रेड सिग्नल दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने या चपलेचा छडा लावला. या प्रवाशाने चप्पलमध्ये ६९.४० लाख रुपये किमतीचे १.२ किलो सोने लपवून ठेवले होते. ते पाहून अधिकारी व कर्मचारीही अवाक झाले. हे सोने जप्त करण्यात आले असून प्रवाशाला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
https://twitter.com/ANI/status/1635883583519748099?s=20
Gold Seized on Airport from Passenger Slipper