मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिंधुदुर्गच्या कुडाळ येथे संपन्न झालेल्या मुलींच्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या साक्षी वानखेडे हिने सुवर्णपदक पटकाविले आहे. या स्पर्धेत पूजा वैष्णव व आनंदी सांगळे यांनी रौप्यपदक, श्रावणी पुरंदरे , करिश्मा शाह यांनी कांस्यपदकाची कमाई केली. त्याचप्रमाणे या स्पर्धेत पूर्वा मौर्य व दिव्या सोनवणे, श्रावणी सोनार यांनी चमकदार कामगिरी केली.