मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील सर्वात मोठ्या गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांपैकी आयआयएफएल फायनान्सने १५ जून २०२२ ते ३० जुलै २०२२ दरम्यान सर्व ग्राहकांसाठी सोने तारण कर्जासाठी ‘सुवर्ण कर्ज मेळाव्या’च्या आयोजनासह आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. या ऑफर्समध्ये जोडप्यांसाठी आलिशान आंतरराष्ट्रीय सहलीच्या ऑफरचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त, आयआयएफएल फायनान्सच्या देशभरातील २४०० हुन अधिक गोल्ड लोन शाखांमधून पुढील ४५ दिवसांच्या कालावधीत सोने तारण कर्ज घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खात्रीशीर भेटवस्तू दिल्या जातील.
आयआयएफएल फायनान्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि सर्वाधिक रिटेल-केंद्रित वित्त कंपन्यांपैकी एक आहे, जिच्या व्यवस्थापनाखाली ५१,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज मालमत्ता उपलब्ध आहे. यातून ८० लाखांहून अधिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतात. ग्राहकांसोबत थेटसंपर्क आणि कमी किमतीत तसेच कोणत्याही छुप्या शुल्काशिवाय कर्ज प्रदान केल्यामुळे आयआयएफएल फायनान्सने लॉकडाऊनच्या काळातही तिच्या ग्राहकवर्ग आणि व्यवसाय लक्षणीयरित्या वाढल्याचे अनुभवले आहे.
आयआयएफएल फायनान्सचे ब्रँड अॅम्बेसेडर रोहित शर्मा हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या आकर्षक भेटवस्तूंसोबतच आयआयएफएल फायनान्स केवळ ५ मिनिटांची जलद कर्ज प्रक्रिया, जास्तीत कर्ज मूल्य आणि सुलभ डिजिटल पेमेंट पर्यायांच्या वचनबद्धतेसह सर्वात कमी व्याजदरांत सोने तारण कर्ज प्रदान करते.
आयआयएफएल फायनान्सच्या गोल्ड लोन्सचे विभागीय प्रमुख श्री. मनीष मयंक म्हणाले की आयआयएफएल सोने तारण कर्ज हे कंपनीच्या पारदर्शक व्यवहार आणि सर्वोत्तम सुवर्ण कर्ज दरांच्या माध्यमातून भारतभरातील लाखो ग्राहकांशी संपर्क साधण्यात सक्षम झाले आहे. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत, या पार्श्वभूमीवर ग्राहकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग म्हणून आम्ही सर्व ग्राहकांना आमच्या ‘सुवर्ण कर्ज मेळावा’ ऑफरचा लाभ घेण्याची संधी देत आहोत. या मेळाव्याच्या माध्यमातून करोडो रुपयांच्या भेटवस्तूही ग्राहकांना दिल्या जातील.