इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
सोने हॉल मार्किंग आणि ग्राहक
सध्या सगळीकडे एक मोठी चर्चा होत आहे ती म्हणजे १ एप्रिलपासून सोने खरेदी-विक्रीचे नियम बदलत आहेत. ज्या ग्राहकांचे जुने दागिने हॉलमार्क नाहीत ते परत घेतले जाणार नाहीत किंवा त्यांना कवडीमोल भावाने विकावे लागतील, असेही संदेश पसरवले जात आहेत. मात्र, खरे काय आहे हे आपण आता जाणून घेऊया…
वास्तविक ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांनी
1 एप्रिल 2023 पासून सोन्याचे दागिने 6 अंकी हॉलमार्किंगसह विकणे साठी ज्वेलर्सना अनिवार्य केले आहे. 1 जुलै 2021 पासून 4 अंकी हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री केली जात होती. सरकारने ज्वेलर्सना 4 अंकी सोन्याचे दागिने विकण्यासाठी 1 वर्ष आणि 9 महिन्यांचा पुरेसा वेळ दिला होता जेणेकरून ते त्यांचा जुना साठा विकू शकतील. सध्या सुमारे 300 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री करणे अनिवार्य झाले आहे, ज्याची यादी BIS साईट वर उपलब्ध आहे.
*ग्राहकांनी एक लक्षात ठेवावे की जेव्हा त्यांना आपले दागिने काही कारणाने विकायचे असतात तेव्हा त्यांनी सरळ आपले दागिने स्वतः हॉल मार्क सेंटर वर जाऊन त्याचे हॉल मार्किंग करून घ्यावे. त्यामुळे आपले दागिने किती शुद्ध आहेत ते आपणास माहीत होईल. शिवाय आपण सोनाराला छातीठोक पणाने सांगू शकता की हे दागिने इतक्या शुद्ध तेचे आहेत (१८/२२/२४ कॅरेट) तेव्हा मला त्याप्रमाणे भाव दे. ग्राहकाला हॉल मार्किंग साठी प्रती दागिना फक्त ४५ रुपये एवढाच खर्च येतो. तेव्हा स्वतः आपल्या जुन्या दागिन्यांचे हॉल मार्क करून घ्या आणि नंतर त्याची विक्री करा.*
आता हॉल मार्क करणे सर्व ज्वेलरना अनिवार्य केले आहे त्याचा फायदा ग्राहकास होईल, कसे ते पहा.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नुसार, सोन्याचे दागिने शुद्धतेसाठी हॉलमार्क केलेला नोंदणीकृत ज्वेलर हेच जबाबदार असतील. नोंदणीकृत ज्वेलर, जो विक्री करतो तो नियमांनुसार शुद्धता किंवा सूक्ष्मतेच्या कोणत्याही कमतरतेसाठी नुकसान भरपाई देण्यास देखील जबाबदार असेल.
BIS कायदा 2016 च्या कलम 29 नुसार:
(i) कलम 14 किंवा कलम 15 मधील पोटकलम (6) किंवा (8) च्या तरतुदींचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती एक वर्षापर्यंत शिक्षेस पात्र आहे. शिवाय रुपये एक लाख दंड होऊ शकतो.
असा दंड हा उत्पादित किंवा विकल्या गेलेल्या किंवा विक्रीसाठी ऑफर केलेल्या वस्तू किंवा वस्तूंच्या मूल्याच्या पाचपट पर्यंत वाढूही शकतो.
परंतु, जेथे उत्पादित किंवा विकल्या जाणाऱ्या किंवा विक्रीसाठी देऊ केलेल्या वस्तू किंवा वस्तूंचे मूल्य ठरवता येत नाही, तेव्हा असे गृहीत धरले जाईल की एक वर्षाचे उत्पादन अशा उल्लंघनात होते आणि मागील आर्थिक वर्षातील वार्षिक उलाढाल वस्तूंचे मूल्य म्हणून गृहीत धरण्यात येईल.
ग्राहकाने शुद्धतेची चाचणी घेतल्यास आणि शुद्धता घोषित शुद्धतेपेक्षा कमी असल्याचे आढळल्यास, BIS नियम, 2018 च्या नियम 49 नुसार ग्राहकाला भरपाई दिली जाईल जी मोजलेल्या फरकाच्या दुप्पट असेल.
हॉलमार्क केलेले आयात दागिने भारतात आणले असतील तर ते पुन्हा भारतात हॉलमार्क करणे आवश्यक आहे.
6 अंकी हॉलमार्किंग दागिन्यांची विक्री करण्याचा नियम ग्राहकांसाठी अधिक सुरक्षित आहे.
31 मार्चनंतरही ग्राहक त्यांचे हॉलमार्किंग नसलेले आणि 4 अंकी हॉल मार्क असलेले सोन्याचे दागिने ज्वेलर्सना विकू शकतात, यावर कोणतेही बंधन नाही.
ग्राहकांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने केला आहे, ज्याची लिंक खाली देत आहे.
पूर्वी ज्वेलर्स जुने दागिने खरेदी करताना मनमानी करत असत. तुम्ही दागिने विकण्यापूर्वी हॉलमार्किंग सेंटरमध्ये हॉलमार्क करून घेऊ शकता, जेणेकरून ज्वेलर्स कॅरेटच्या शुद्धतेबद्दल तुमची फसवणूक करू शकणार नाहीत.
https://www.bis.gov.in/hallmarking-overview/hallmarking-faqs/mandatory/
आपणास काहीही मदत लागली तर संपर्क साधा.
आमची वेबसाईट : www.abgpindia.com
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
अधिक माहितीसाठी संपर्क
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोकण प्रांत* सौ वेदा प्रभूदेसाई 9075674971
*देवगिरी परभणी* श्री विलास मोरे 09881587087
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव, मो. 7798439555
*नंदुरबार* श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786
Gold Jewelry Hallmarking Compulsion 1 April by Vijay Sagar