नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोने हा अत्यंत मौल्यवान धातू समजला जातो, सोन्याचे दागिने घालण्याची हौस बहुतांश जणांना असते. विशेषतः महिला वर्गांनी सोन्याचे दागिने ची खूप आवड असते. मात्र सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्यात येते. त्या संदर्भात काही नियम आहेत. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींच्या अनिवार्य हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा यावर्षी दि. 1 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे अनिवार्य हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात तीन अतिरिक्त कॅरेट (20, 23 आणि 24 कॅरेट) सोन्याचे दागिने व्यतिरिक्त, 32 नवीन जिल्हे अनिवार्य हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्याच्या कक्षेत येतील, पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर, ‘असे आणि हॉलमार्क सेंटर (AHC)’ दुसऱ्या टप्प्याच्या कक्षेत येईल, असे मंत्रालयाने सांगितले.
केंद्र सरकारने या संदर्भात एक आदेश अधिसूचित केला आहे आणि तो दि. 1 जून 2022 पासून लागू होईल. हॉलमार्किंग हा सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा आहे. हॉलमार्किंग हे 16 जून 2021 पर्यंत ऐच्छिक होते. त्यानंतर सरकारने टप्प्याटप्प्याने सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात देशातील २५६ जिल्हे त्याच्या कक्षेत आणण्यात आले.
भारतीय मानक ब्युरो (BIS) ने 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये सोन्याचे अनिवार्य हॉलमार्किंग यशस्वीरित्या लागू केले आहे जिथे दररोज 3 लाखाहून अधिक सोन्याचे दागिने हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) सह हॉलमार्क केले जात आहेत. दरम्यान, आता मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, BIS च्या तरतुदीनुसार, सामान्य ग्राहक BIS द्वारे मान्यताप्राप्त AHC मध्ये सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता देखील तपासू शकतो.