इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होऊन साडेपाच हजार रुपये सोने स्वस्त झाले आहे. बुधवारी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी किंमत ९६ हजार ५९३ असा होता. २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर १ लाख २ हजार ७३ रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात तोळ्यामागे २० दिवसात जवळपास साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे.
आगामी काळातही सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळेल असे तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या लग्नसराई असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्थ्यावर पडणारी मानली जात आहे.
सध्याचा दर ही खरेदीसाठी चांगली संधी ठरु शकते. मात्र, जागतिक बाजारातील चढ- उतार लक्षात घेता, गुंतवणुकीचा निर्णय़ घेताना योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.