मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

यावरच कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून…कांदा उत्पादक संघटनेने केली ही मागणी

by Gautam Sancheti
मे 14, 2025 | 3:05 pm
in संमिश्र वार्ता
0
kanda onion

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक जिल्ह्यात २०२३-२४ च्या हंगामात दुष्काळ असल्याने कांद्याचे लागवड क्षेत्र कमी होते परंतु २०२४-२५ च्या हंगामात पाऊस चांगला झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड झालेली आहे.

बेमोसमी पावसाने आधीचे कांदा रोपे खराब झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा कांदा रोपे तयार करून कांदा लागवड केल्याने यावर्षीच्या हंगामात उन्हाळी कांद्याच्या दोन टप्प्यात लागवडी झाल्या होत्या. त्यातील आगाप कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर उत्पादन चांगले मिळाले आहे. तर उशिराने लागवड केलेल्या कांद्यांना थंडी कमी प्रमाणात मिळून वाढलेल्या तापमानामुळे प्रति एकर कांद्याच्या उत्पादनात घट दिसून आली आहे. तरीही एकूण लागवडीचे क्षेत्र जास्त असल्याने जिल्ह्यात मुबलक प्रमाणात कांदा उत्पादन झाले आहे.

आता बहुतेक शेतकऱ्यांची कांदा काढणी झाली असून सध्या कांद्याला बाजारभाव अत्यल्प मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल कांदा साठवणुकीवर दिसून येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा काढणी करून चाळींमध्ये साठवून झाला आहे. परंतु गेल्या आठ दिवसांपासून बेमोसमी पाऊस व गारपिटीने काही भागांमध्ये काढणी करणे शिल्लक असलेला कांदा शेतातच भिजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे.

यावर्षी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकसाठी ३ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातून नाफेड दीड लाख टन तर एनसीसीएफकडून दीड लाख टन कांदा खरेदी केली जाणार आहे. अजून तरी नाफेड एनसीसीएफची कांदा खरेदी सुरू झाली नाही त्यामुळे शेतकरी सरकारी कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत
बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळणारा सरासरी ७०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल हा निचांकी दर असून शेतकऱ्यांना कांदा विक्रीतून नफा होण्याऐवजी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत.

सध्या कांदा निर्यातीवर कुठलेही बंधने नसले तरी कांद्याची निर्यात संथगतीने होत आहे सर्वात जास्त कांदा निर्यात होणाऱ्या बांगलादेशात स्थानिक कांदा सुरू असल्याने तेथे भारतीय कांद्याची मागणी कमी आहे केंद्र सरकारने कांदा निर्यातीच्या वाढीसाठी उपाययोजना केल्या आणि नाफेड व एनसीसीएफच्या बफर स्टॉकसाठी थेट बाजार समित्यांमधून लिलावद्वारे शेतकऱ्यांचा कांदा खरेदी केला तरच कांद्याच्या दरवाढीची संधी दिसत आहे कांद्याला पुढील काळात भाववाढ होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी प्रतवारी करून आपापला कांदा चाळींमध्ये साठवून ठेवला आहे देशांतर्गत मागणी आणि जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी कांदा निर्याती संदर्भातील सरकारी उपयोजना यावरच कांदा दरवाढीचे भवितव्य अवलंबून असल्याचे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोन्याचा दरात प्रतितोळा ५५०० रुपयांनी घसरण…बघा आजचा सोन्याचा भाव

Next Post

गाड्यांना जुने स्पीड गव्हर्नर असताना नवीन बसविण्याची सक्ती….या असोसिएशनने दिले उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250514 WA0263 2

गाड्यांना जुने स्पीड गव्हर्नर असताना नवीन बसविण्याची सक्ती….या असोसिएशनने दिले उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

solar e1703396140989

मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग…विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान

जुलै 8, 2025
bus

एस.टी. कार्यशाळेतील भांडार खरेदीत घोटाळा…१५ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जुलै 8, 2025
crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011